Eco friendly bappa Competition
घर पालघर बोईसर रेल्वे स्थानकावर महिलांशी छेडछाड करणार्‍या आरोपीला अटक

बोईसर रेल्वे स्थानकावर महिलांशी छेडछाड करणार्‍या आरोपीला अटक

Subscribe

मुलींचे वीना परवानगी व्हीडीयो शुटींग काढत असल्याचे महीलेच्या लक्षात आले.या बाबत आरोपीला विचारणा केली असता त्याने महीलेच्या हातावर वार करून पळून गेला होता.

बोईसर:बोईसर रेल्वे स्थानकावर विरार लोकलची वाट पाहत उभी असलेली महिला आणि तिच्या सोबतच्या मुली यांच्या बरोबर छेडछाड तसेच गैरवर्तन करणार्‍या आरोपीला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. ७ जून रोजी संध्याकाळी ५.३० वाजेच्या सुमारास बोईसर रेल्वे स्थानकावरील फलाट क्र.३ वर एक महिला तिची मुलगी आणि मुलीच्या चार मैत्रीणीसोबत विरार लोकलची वाट पाहत उभ्या होत्या.त्या वेळी बोईसर अवधनगर येथे राहणारा आरोपी समीमफूल खान (२५) हा गुपचुप आपल्या मोबाईल मधून महिला आणि मुलींचे वीना परवानगी व्हीडीयो शुटींग काढत असल्याचे महिलेच्या लक्षात आले.या बाबत आरोपीला विचारणा केली असता त्याने महिलेच्या हातावर वार करून पळून गेला होता.
  याबाबत महिलेने पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे येथे  केलेल्या तक्रारीवरून गुन्हा रजि.नं.११०/२०२३ कलम ३५ (क) भा.दं.वि.अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याची माहिती मिळताच तात्काळ पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन बोईसर स्टेशन परिसरात आरोपीच शोध सुरू केला होता.तक्रारदार महीलेने आरोपीच्या सांगितलेल्या वर्णणानुसार अवघ्या दोन तासात अवधनगर येथे राहणार्‍या समीमफूल खान याच्या मुसक्या आवळल्या.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -