घरपालघररेती उत्खनन उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

रेती उत्खनन उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई

Subscribe

या कारवाईत बोटीत रेती आढळून आली नसून ६ बोटी आणि पाच सेक्शन पंप नष्ट करण्यात आल्या. या कारवाईमुळे स्थानिक रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

सफाळे: पालघर तालुक्यातील पारगाव परिसरातील रेती उत्थनन उल्लंघन करणार्‍यांवर पालघर महसूल विभागाकडून मंगळवारी दुपारी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईत ६ बोटी व ५ सेक्शन मशीन जाळून नष्ट करण्यात आल्या. मात्र कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.पालघर जिल्हाधिकारी यांचे मनाई आदेश असताना वैतरणा खाडीत रेती उल्लंघन होत असल्याची माहिती पालघर महसूल विभागाला मिळाली होती.
गौनखणिज उत्खनन आणि वाहतूक परवाना नसताना रेती उत्खनन होत होते. पालघर महसूल विभागातील अधिकारी तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार संभाजी पावरा, मारोती सुर्यवंशी, मंडळ अधिकारी ज्योती वरे, पोलीस कर्मचारी राम डाखुरे, दत्ता शिंदे, वैभव सातपुते, कोतवाल मनोज कुडु यांच्या संयुक्त सहकार्याने पारगाव परिसरातील नदी पात्रात धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत बोटीत रेती आढळून आली नसून ६ बोटी आणि पाच सेक्शन पंप नष्ट करण्यात आल्या. या कारवाईमुळे स्थानिक रेती व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

 

- Advertisement -

पथकाचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार

कारवाई करणार्‍या पथकातील अधिकारी आणि कर्मचार्‍यांचा जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.पालघर तहसीलदार कार्यालयातील नायब तहसीलदार संभाजी पावरा,जिल्हा खनिकर्म विभागाचे अधिकार शुल्क निरीक्षक मारोती सूर्यवंशी, दहिसरच्या मंडळ अधिकारी ज्योती वरे,पोलीस कर्मचारी राम डाखुरे, दत्ता शिंदे,वैभव सातपुते आणि कोतवाल मनोज कुडु यांचा सत्कार जिल्हाधिकार्‍यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -