काशिमिरा येथे हिलटॉप लॉजिंगवर कारवाई

काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसावे येथे घोडबंदर रोडवर असलेल्या हिलटॉप लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.

काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरसावे येथे घोडबंदर रोडवर असलेल्या हिलटॉप लॉजिंगमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार अनैतिक मानवी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संपत पाटील यांनी सापळा रचत हिलटॉप लॉजिंग आणि बोर्डींग येथे लॉजिंगचा मॅनेजर, वेटर व वॉचमन पुरणसिंग हे लॉजमध्ये येणार्‍या पुरुष गिर्‍हाईकाकडून वेश्यागमनाच्या मोबदल्यात मुली पुरवत असताना आढळून आल्याने पिटा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसांनी बोगस गिर्‍हाईक यांना हिलटॉप लॉजिंग आणि बोर्डींग या ठिकाणी पाठवून बुधवारी सायंकाळी छापा टाकला. या छापा कारवाईमध्ये हिलटॉप लॉजचे वॉचमन पुरणसिंग याने वेश्यागमनाच्या मोबदल्यात बोगस गिर्‍हाईकाला वेश्यागमनाकरता मुलगी पुरविल्याचे निष्पन्न झाल्याने पिडित मुलीची सुटका करुन हिलटॉप लॉजिंग आणि बोर्डिंगचे मॅनेजर रमेश भिवा वाडु (वय ४५), पिंटू ठाकुर (वय ३८), वॉचमॅन पुरण सिंग (वय ४३) व पाहिजे आरोपी हॉटेलचे चालक आणि मालक यांच्या विरोधात सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरुन काशिमिरा पोलीस ठाणे येथे गुन्हा भादवि कलम ३७०, ३४ सह अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५, ७ प्रमाणे दाखल करण्यात आला आहे.

कारवाई ही डॉ. महेश पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), अमोल मांडवे, सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे मार्गदर्शनाखाली वरीष्ठ पोलीस निरीक्षक संपत पाटील, सहायक पोलीस निरीक्षक उमेश पाटील, विजय निलंगे, रामचंद्र पाटील, पोलीस शिपाई केशव शिंदे, सुप्रिया तिवले व चालक सम्राट गावडे अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, भाईंदर यांनी केली आहे.

हेही वाचा – 

‘या’ जिल्ह्यात बियरच्या विक्रीत वाढ