घरपालघरडहाणूत अवैध माती उत्खननावर कारवाई

डहाणूत अवैध माती उत्खननावर कारवाई

Subscribe

डहाणू येथे पश्चिम रेल्वेच्या सुरू असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गावर भरणी करण्यासाठी तालुक्यातील आगवन येथे भूभागातून माती काढण्याची परवानगी डहाणू महसूल विभागाकडून घेण्यात आली होती.

डहाणू येथे पश्चिम रेल्वेच्या सुरू असलेल्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गावर भरणी करण्यासाठी तालुक्यातील आगवन येथे भूभागातून माती काढण्याची परवानगी डहाणू महसूल विभागाकडून घेण्यात आली होती. महसूल विभागाने या जागेतून ५०० ब्रास माती उत्खनन करण्याची परवानगी संबंधितांना दिली होती. परंतु, फक्त ५०० ब्रास माती काढण्याची परवानगी असताना संबंधित ठेकेदाराने शासनाची फसवणूक करत परवानगी पेक्षा जास्त माती उत्खनन करून शासनाची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत डहाणू महसूल विभागाकडे तक्रार आली असता त्यांनी तक्रारीची दखल घेत घटनास्थळी दाखल होऊन जागेची पाहणी करत संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

डहाणू तालुक्यातील काही ठिकाणी बेकायदेशीर मुरूम व माती उत्खनन सुरू असून या अवैध उत्खननामुळे पर्यावरणाला मोठी हानी पोहोचत आहे. मातीचे उत्खनन करणार्‍या ठेकेदारांनी शासनाची परवानगी घेऊन दिलेल्या रॉयल्टी व नियमांनुसारच माती उत्खनन करावे. कोणी शासनाची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल.
– असीमा मित्तल, सहाय्यक जिल्हाधिकारी, डहाणू

- Advertisement -

डहाणू तालुक्यातील आगवन येथे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर मार्गावर भरणी करण्यासाठी दिलेल्या परवानगी पेक्षा जास्त प्रमाणात माती उत्खनन होत असल्याची माहिती डहाणू महसूल विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक जिल्हाधिकारी असिमा मित्तल व डहाणू तहसीलदार अभिजित देशमुख यांनी संबंधितस्थळी धाड टाकली असता जमीन मालक व ठेकेदार यांनी संगनमताने शासनाने दिलेल्या परवानगी पेक्षा सुमारे १५०० ब्रास अधिकचे मातीचे उत्खनन केल्याचे निदर्शनास आले आहे. महसूल विभाग घटनास्थळी दाखल झाल्यानंतर सदरचे काम बंद करण्यात आले आहे. तसेच जागेवर उपलब्ध ९ डंपर आणि १ जेसीबी मशीन जप्त करण्यात आले आहेत. परवानगी पेक्षा जास्त माती उत्खनन केल्याचा पंचनामा करण्यात आला असून भूमाफियांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

(कुणाल लाडे – हे डहाणूचे वार्ताहर आहेत.)

- Advertisement -

हेही वाचा – 

रणजितसिंह डिसले यांना अमेरिकेत जाण्याकरिता रजा मंजूर करा; वर्षा गायकवाडांचे आदेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -