घरपालघरवाड्यात थकित पाणीपट्टी विरोधात कारवाई सुरू

वाड्यात थकित पाणीपट्टी विरोधात कारवाई सुरू

Subscribe

या 20 वर्षात शहराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढूनही प्रशासनाने येथील पाणीपुरवठ्या संदर्भात काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत.

वाडा: वारंवार सूचना करुनही गेल्या अनेक वर्षांपासूनची थकित असलेली पाणीपट्टी न भरणार्‍या नळधारकांवर वाडा नगरपंचायतीने कारवाईचा बडगा उगारला आहे. नळाद्वारे थेट घरामध्ये होणारा पाणी पुरवठा करणारी नळजोडणी खंडित करण्यास सुरुवात केल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. वाडा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी शहराच्या उंच ठिकाणी एकमेव जलकुंभ आहे. गेल्या 20 वर्षांपासून या एकमेव असलेल्या जलकुंभातून शहराला पाणीपुरवठा होत आहे. या 20 वर्षात शहराची लोकवस्ती मोठ्या प्रमाणावर वाढूनही प्रशासनाने येथील पाणीपुरवठ्या संदर्भात काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत.

अनेकांनी अनाधिकृत नळजोडण्या तसेच अर्धा इंच जोडणीची परवानगी असताना एक ते दीड इंचीपर्यंत अनधिकृत नळ जोडणी घेऊन नगरपंचायत प्रशासनाची फसवणूक केली आहे. तर काही जोडणी धारकांनी वर्षोनुवर्षे पाणीपट्टीची भरणा केलेली नाही.थकीत पाणीपट्टी धारकांना वारंवार सुचना करुनही ज्या थकित ग्राहकांनी अजुनही भरणा केलेली नाही, अशा ग्राहकांची नळजोडणी खंडित करण्यास नगरपंचायत प्रशासनाने मंगळवार (3 एप्रिल) पासून सुरुवात केली आहे. पहिल्याच दिवशी 27 नळजोडण्या खंडित करुन आतापर्यंत ५६ नळ जोडण्या या थकित पाणीपट्टी धारकांचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला.

- Advertisement -

ही कारवाई अशीच पुढे सुरु राहणार असून घरपट्टी थकित असणार्‍या घर मालकांच्याही थकित रकमे इतक्या
घरातील वस्तुंची जप्ती करण्यात येणार आहे.

मनोज पष्टे – मुख्याधिकारी, नगरपंचायत, वाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -