घरपालघरनालासोपाऱ्यात बर्फ विक्रेत्यावर कारवाई

नालासोपाऱ्यात बर्फ विक्रेत्यावर कारवाई

Subscribe

याच सोसायटीच्या गटारावर शब्बीर खान बर्फवाला बर्फाच्या लाद्या ठेवून विक्री करत असल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

वसईः वसईविरार महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने नालासोपारा येथे एका बर्फ विक्रेत्याविरोधात धडक कारवाई केली. महापालिकेच्या पाहणीत सदर विक्रेता गटारावर बर्फाच्या लाद्या ठेवून त्यांची विक्री करत असल्याचे लक्षात आल्याने पालिकेने ही कारवाई केली. जप्त करण्यात आलेल्या दहा बर्फाच्या लाद्या तोडून तात्काळ त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.वसईविरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या आदेशानुसार, घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत प्रतिबंधित प्लास्टिकविरोधातील शोधमोहीम तीव्र करण्यात आलेली आहे. या मोहिमेंतर्गत नालासोपारा पूर्व येथील कावेरी कोऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटीत कारवाई सुरू होती. याच सोसायटीच्या गटारावर शब्बीर खान बर्फवाला बर्फाच्या लाद्या ठेवून विक्री करत असल्याचे महापालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले.

त्यामुळे या बर्फ विक्रेत्याविरोधातही कारवाई करण्यात आली. अशा पद्धतीने बर्फ विक्री केल्याने दूषित पाणीहवा संसर्ग होऊन टॉयफॉइड, कॉलरा, डेंग्यू असे जलजन्य आजार पसरत असतात. या आजारांमुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे तात्काळ कारवाई करून या बर्फाची विल्हेवाट लावण्यात आली, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी दिली. प्रतिबंधित प्लास्टिकविरोधातील मोहिमेत हरिश गीताराम माळी यांच्या गाळा क्रमांक ७ मधून सात गोण्या ताब्यात घेण्यात आल्या. यात २०५ किलो वजनाचे प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करण्यात आले. यात प्लास्टिक चमचे, ग्लास व झबला पिशव्यांचा समावेश आहे. तर पाच हजार रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे. ही कारवाई दिवाळीनंतही सुरूच राहणार असल्याची माहितीही सहाय्यक आयुक्त सुकदेव दरवेशी यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -