घरपालघरनवरात्र उत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार

नवरात्र उत्सवात नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई करणार

Subscribe

सण साजरे करा पण कुठेही गालबोट किंवा अनुचित प्रकार पोलीस कडक कारवाई करतील असे सांगितले आहे.

भाईंदर :- मिरा- भाईंदर शहरात कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर मोठ्या जल्लोषात नवरात्रोत्सव साजरा करण्यास सुरूवात केली आहे. कोरोनामुळे सणांवर दोन वर्षे निर्बंध आले होते. यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटवल्यामुळे यावर्षी मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरात ठीक-ठिकाणी सोसायटीच्या आवारात, खाजगी जागेवर परवानगी घेऊन मोठ्या प्रमाणात गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोणी नियमांचे उल्लंघन केल्यास व उशिरा पर्यंत वाद्य वाजवून ध्वनि प्रदूषण केल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करत कारवाई करण्यात येणार असल्याचे मीरा भाईंदर वसई विरार पोलीस उपआयुक्त विजयकांत सागर यांनी सांगितले आहे. सण साजरे करा पण कुठेही गालबोट किंवा अनुचित प्रकार पोलीस कडक कारवाई करतील असे सांगितले आहे.

मिरा- भाईंदर महापालिका, वाहतूक पोलीस,स्थानिक पोलीस यांच्याकडे नवरात्रीचे आयोजन करण्यासाठी परवानगी घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्ज आले होते. परवानगी घेण्यासाठी आलेल्या सर्व मंडळांना पोलीस आयुक्तालयाकडून सर्व अटी शर्ती व वेळेची मर्यादा या बाबत माहिती देण्यात येते. तरी देखील काही जणांकडून नियमांचे उल्लंघन केल्यास व उशिरापर्यंत वाद्य वाजवून ध्वनि प्रदूषण केले जाते. वेळ मर्यादेचे व नियमांचे उल्लंघन कोणीही करू नये असे विजयकांत सागर यांनी सांगितले आहे. आयुक्तालयाच्या हद्दित नवरात्रोत्सवासाठी पोलीस स्टेशन हद्दित खाजगी व सार्वजनिक मूर्ती, घट, फोटो यांची स्थापना करण्यात येणार आहे. याची आकडेवारी नोंदवण्यात आली आहे. मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तलयात गेल्यावर्षी नोंद करण्यात आलेली आकडेवारी व यंदाच्या वर्षात नोंद केलेल्या आकडेवारीमध्ये खूप फरक आहे. यावर्षी मूर्ती स्थापनेच्या संख्येत वाढ झाली आहे. आयुक्तालयाच्या २०२२ या वर्षाच्या आकडेवारी नुसार १४ पोलीस ठाण्याच्या हद्दित सार्वजनिक ४९६ मूर्ती तर खाजगी जागी १२२३ मूर्ती स्थापन करण्यात येणार आहेत. सार्वजनिक ४९२ ठिकाणी प्रतिमा व फोटो वापरण्यात येणार आहे तर १०२ खाजगी ठिकाणी फोटो व प्रतिमेचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी ७ तर खाजगी जागी २८९० घट बसवण्यात येणार आहेत. २०२१ या वर्षात ४४४ सार्वजनिक ठिकाणी तर १७८४ खाजगी ठिकाणी मूर्ति स्थापना करण्यात आली होती.२१४ सार्वजनिक ठिकाणी तर १८४ खाजगी ठिकाणी फोटोची स्थापना करण्यात आली होती. ७ ठिकाणी सार्वजनिक व ३७८३ ठिकाणी खाजगी घट स्थापना करण्यात आली होती. तर नियमांचे उल्लंघन करणार्‍या १३ जणांवर दखलपात्र गुन्हे दाखल करण्यात आले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -