घरपालघरवसई न्यायालयात’अ‍ॅडव्होकेट डे’

वसई न्यायालयात’अ‍ॅडव्होकेट डे’

Subscribe

डॉ. पेस्तनजी यांनी वकिलांना होणार्‍या पाठ दु:खी, मान दु:खी, साईटीका, चालताना होणारा त्रास , संधिवात, गुडघे दु:खी, अन्य हाडांच्या समस्याबद्दल उपचार आणि मार्गदर्शन केले.

वसईः स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे नामांकित वकील होते. त्यांचा जयंती दिन वकिल दिन म्हणून देशभर साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून वसई न्यायालयात नुकताच ’अ‍ॅडव्होकेट डे’, अर्थात वकील दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. वसईतील विविध न्यायालयांचे सर्व न्यायाधीश आणि चारही वकील संघटनांतील वकील मोठ्या संख्येने प्रथमच एकत्र आले होते. वसई न्यायालयात ’अ‍ॅडव्होकेट डे’ निमित्त सर्व वकिलांसाठी मोफत आरोग्य शिबीर ठेवण्यात आले होते. वसईतील हाडाचे प्रसिद्ध डॉक्टर मॅलकम पेस्तनजी आणि त्यांच्या गोल्डनपार्क रुग्णालयातील पथकाने यावेळी ईसीजी, बीपी आणि मधुमेह रुग्णांसाठी आरबीएसची मोफत चाचणी केली. डॉ. पेस्तनजी यांनी वकिलांना होणार्‍या पाठ दु:खी, मान दु:खी, साईटीका, चालताना होणारा त्रास , संधिवात, गुडघे दु:खी, अन्य हाडांच्या समस्याबद्दल उपचार आणि मार्गदर्शन केले.

दुपारच्या सत्रात अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-1 आणि सत्र न्यायाधीश एस. वी. खोंगल, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-2 आणि सत्र न्यायाधीश आर. डी. देशपांडे, सिवील जज्ज (दिवाणी) वरिष्ठ स्तर आर. एच. नाथानी, एन. के. पाटील आाणि अतिरिक्त मुख्य न्यायीक मेजीस्ट्रेट जी. जी. कांबळे, एम. जे. शेख , एस. एस. जैसवाल व प्रशांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत वकिलांचा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला. सर्वप्रथम अ‍ॅड. अशफाक यांनी डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या भाषणाचे वाचन केले. अ‍ॅड. प्रल्हाद राणा यांनी ’अ‍ॅडव्होकेट डे’ बद्दल माहिती दिली. अ‍ॅड. कृष्णा राठोड, अ‍ॅड. भरत पाटील, अ‍ॅड. आनंद घरत, अ‍ॅड. दिगंबर देसाई, सरकारी वकिल भुपेश पुरंदरे यांनी कविता सादरीकरण , तथा गीत गायन यावेळी केले. न्यायाधीश एस. वी. खोंगल यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले. अ‍ॅड. साधना धुरी, अ‍ॅड. जॉर्ज फरगोस यांनी आभार मानले. सुत्रसंचालन अ‍ॅड. नयन जैन यांनी केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -