घरपालघरअडीचशेहून अधिक बळी गेल्यानंतर पालकमंत्री वसईत

अडीचशेहून अधिक बळी गेल्यानंतर पालकमंत्री वसईत

Subscribe

अडीचशेहून अधिक बळी, रेमडेसिवीरचा काळाबाजार, ऑक्सीजनची पळवापळवी, आरोग्य यंत्रणेचे अपयश अशा अनेक गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर गायब असलेले पालकमंत्री वसईत सोमवारी अवतरले. दुपारी तीनची वेळ दिलेल्या पालकमंत्र्यांनी वेळेआधी वसईचा धावता दौरा, अधिकार्‍यांशी चर्चा करून पत्रकारांना बहुमोल माहिती देऊन निघून गेले.

अडीचशेहून अधिक बळी, रेमडेसिवीरचा काळाबाजार, ऑक्सीजनची पळवापळवी, आरोग्य यंत्रणेचे अपयश अशा अनेक गंभीर समस्यांच्या पार्श्वभूमीवर गायब असलेले पालकमंत्री वसईत सोमवारी अवतरले. दुपारी तीनची वेळ दिलेल्या पालकमंत्र्यांनी वेळेआधी वसईचा धावता दौरा, अधिकार्‍यांशी चर्चा करून पत्रकारांना बहुमोल माहिती देऊन निघून गेले. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादाजी भुसे यांनी सोमवारी पालघरसह वसई-विरार महापालिका क्षेत्राची पाहणी केली. त्यानंतर महापालिका मुख्यालयात अधिकार्‍यांसोबत घेतलेल्या आढावा बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोना नियंत्रण आणि उपचारासाठी महापालिका करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

विरार पश्चिम येथील म्हाडा इमारतीत होत असलेल्या ५०० खाटाच्या रुग्णालयाची त्यांनी माहिती दिली. चार वर्षांपासून बंद असलेल्या नालासोपारा येथील मासळी मार्केटचे रूपांतरण दीडशे बेडच्या आयसीयू रुग्णालयात करत असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांचे अलगीकरण-विलगीकरण करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक सर्कलनिहाय सीसीसी सेंटर करण्याचा निर्णय झाला आहे. वसई-विरार महापालिकेनेही म्हाडाच्या इमारती अधिग्रहीत करून ५००-५०० क्षमतेचे सीसीसी सेंटर उभारणी सुरु झाली आहे. म्हाडाची आणखी एक इमारत ताब्यात घेऊन त्या ठिकाणीही सीसीसी सेंटर उभे करण्यात येणार आहे. त्यापुढील टप्प्यात जिथे ऑक्सिजन पुरवठा केला जातो. रुग्ण किंवा त्या संदर्भात व्यवस्था केली जाते. त्याठिकाणी आणखी बेड्स वाढवण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यासाठी ४२ मेट्रिक टन ऑक्सिजनची आवश्यकता पडू शकते. आजघडीला २५ मेट्रिक टन ऑक्सिजन मिळत असून, त्याचा सुरळीत पुरवठा सुरु करण्यात आला आहे. मध्यवर्ती नियोजनाप्रमाणे त्या त्या हॉस्पिटलला रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. सीटी स्कॅनबाबत सरकार नियमाप्रमाणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले आहेत. काही रुग्णालयांत दिवसाचे २५०० तर रात्रीचे २००० रुपये चार्जेस आकारले जात आहेत. तिथे २००० रुपयेच आकारले जावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजनकरता सरकारी रुग्णालयांना प्रथम प्राधान्य असेल. दुसर्‍या क्रमांकावर जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आहेत. त्यांना ऑक्सिजन पुरवठा केला पाहिजे. त्यातून जो उरेल तो महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांना आवश्यकता असेल, तिथे देऊ शकतो, अशी चर्चा या बैठकीत झाली असल्याची माहिती भुसे यांनी दिली.

- Advertisement -

हेही वाचा –

भाजप नेत्याच्या नंदुरबारमधील हॉटेलमध्ये हजारो रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा – नवाब मलिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -