Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर उपोषणानंतर सायदे धरणाच्या दुरुस्तीला प्रारंभ

उपोषणानंतर सायदे धरणाच्या दुरुस्तीला प्रारंभ

Subscribe

मात्र संबंधित विभाग बधला नाही. यामुळे अखेर यासाठी वाघ यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर आता अखेर या धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

मोखाडा: सायदे धरणातून भर उन्हाळ्यात दुरुस्तीच्या नावाने येथील धरणाचे पाणी सोडून दिले होते. धरणाला गळती लागल्याने पाणीसाठा शुन्यावर आला होता. मात्र तरीही दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होत नव्हती. याबाबत उपसभापती प्रदीप वाघ यांनी शेतकर्‍यांची अडचण मांडत दुरुस्ती तत्काळ व्हावी यासाठी अनेक पत्रव्यवहार केले. मात्र संबंधित विभाग बधला नाही. यामुळे अखेर यासाठी वाघ यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर आता अखेर या धरणाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे.

मोखाडा तालुक्याची आजची स्थिती म्हणजे ‘चोहीकडे पाणी तरीही हंडे रिकामे अशी अवस्था आहे. धरणांचा तालुका असूनही एकाही धरणाचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी म्हणा की सिंचनासाठी म्हणा होत नसल्याचे चित्र आहे. वर्षानुवर्षे काम चालू असूनही अद्याप धरणांची कामे पूर्णच होत नाहीत. याहून भयंकर म्हणजे कालव्यांची कामे अपूर्ण असतानाच या धरणांना गळती लागली आहे. यामुळे खर्‍या अर्थाने सिंचन घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

असाच प्रकार सायदे येथील धरणाच्या बाबतीत घडला होता. मोखाडा तालुक्यात पळसपाडा, तुळ्याचा पाडा, डोल्हारा, सायदे, खोच याठीकाणी मोठ्या साठ्यांची धरणे आहेत. मात्र या धरण निर्मितीचा नेमका उपयोग काय, हे आज धरण बांधून १० ते २० वर्षे होत आली तरीही समजलेला नाही. कारण या धरणसाठ्यातून कोणत्याही ठिकाणी गावांसाठी पाणीपुरवठा योजना झालेली नाही.शेतकर्‍यांसाठी सिंचनाची सोयही नाही. यामुळे फक्त कोणाच्यातरी तुंबड्या भराव्यात यासाठी हे धरण बांधले का असा प्रश्न निर्माण होत आहे. या सर्वांतील एक गंभीर बाब म्हणजे धरणापासून इच्छित ठिकाणी पाणी पोहचवण्यासाठी कालवे बांधण्यात आले. मात्र आजही या कालव्यांचे काम अपूर्ण असून कालव्यांना गळती लागली आहे. एवढेच काय तर धरणांनाही गळती लागली आहे.यामुळे अजून कामच अपूर्ण असतानाच या धरणांच्या दुरुस्त्यांवरही कोट्यवधींचा खर्च करण्यात येत असल्याची गंभीर बाब आता समोर येत आहे. सायदे धरणाबाबतही असाच प्रकार उघडकीस येत असून भर उन्हाळ्यात याधरण क्षेत्रातील आणि कालव्यांच्या मार्गातील शेतकर्‍यांना यांचा थोडाफार फायदा होत असताना चक्क दुरुस्तीच्या नावाने पाणीच सोडून दिले आणि दुरुस्तीही सुरू होत नव्हती याबाबत त्या लोकप्रतिनिधी म्हणून उपसभापती वाघ यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्यानंतर अखेर या धरणाच्या दुरुस्तीला सुरूवात झाली आहे. याबाबत या भागातील शेतकर्‍यांनी वाघ यांचे आभार मानले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -