घरपालघरडहाणू नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर

डहाणू नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर

Subscribe

डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे अकस्मात निधन झाल्याननंतर डहाणू नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर पडल्याचे चित्र आहे.

डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे अकस्मात निधन झाल्याननंतर डहाणू नगरपरिषदेचा कारभार वाऱ्यावर पडल्याचे चित्र आहे. पिंपळे यांचा २९ मार्च रोजी मुंबई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याआधी ही त्यांची प्रकृती चांगली नसल्यामुळे अतुल पिंपळे अनेक दिवस कामावर गैरहजर रहात होते. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून डहाणूला पूर्णवेळ मुख्याधिकारी देण्यात आला असून डहाणूचे तहसिलदार राहुल सारंग यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

नगराध्यक्ष भरत राजपूत आणि अतुल पिंपळे यांच्यामधील वाद देखील गेल्या अनेक महिन्यांपासून डहाणूकरांसाठी चर्चेचा विषय बनला होता. त्यांच्यातील वाद सुरू असताना देखिल अनेकवेळा मुख्याधिकारी अतुल पिंपळे कामावर गैरहजर रहात होते. त्यामुळे जवळपास एक वर्षांपासूनच नगरपरिषदेचा कारभार व्यवस्थित चालत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच पूर्णवेळ मुख्याधिकारी नसल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

अतुल पिंपळे यांच्या निधनांनंतर डहाणू नगरपरिषदेच्या कारभार तलासरी नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आला होता. परंतु लगेच काही दिवसात त्यांच्याकडून पदभार काढून घेत डहाणू तहसिलदार राहुल सारंग यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनतर आजतागायत नगपरिषदेचा कारभार तहसीलदार राहुल सारंग सांभाळत आहेत. तहसिलदार राहुल सारंग यांच्याकडे आधीच तालुक्याचा भार आहे. त्यातच मध्यंतरी कोविडचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रादुर्भाव रोखण्याची महत्वाची कामगिरीही त्यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडली आहे. एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळून सारंग नगरपरिषदेचा कारभार ही पाहत आहेत. परंतु रोजची कामे सुरळीत सुरू असली तरी नवीन कामे मात्र अजूनही अडकलेलीच आहेत.

तसेच पूर्ण तालुक्याची जबाबदारी सांभाळताना त्यांना नगरपरिषदेला पाहिजे तसा वेळ देता येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळेच डहाणू नगरपरिषदेत लवकरात लवकर पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. कायमस्वरुपी मुख्याधिकारी नसल्याने दैनंदिन कामाकाजावर परिणाम होताना दिसत आहे. म्हणूनच नगरपरिषदचा कारभार व्यवस्थित सुरू मार्गी लागून लोकहिताची कामे पार पाडण्यासाठी पूर्णवेळ मुख्याधिकारी नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

मुंबईतील पूर स्थिती रोखण्यासाठी “विशेष प्रकल्प निधी”ची तरतूद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -