HomeपालघरAgriculture Office:मंडळ कृषी कार्यालयाची डागडुजी करण्याची मागणी

Agriculture Office:मंडळ कृषी कार्यालयाची डागडुजी करण्याची मागणी

Subscribe

.प्रस्तुत कार्यालयाची ईमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवीतालाही धोका होणार असल्याने सदर ईमारतीची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

मोखाडा : तालुक्यातील अतिशय महत्वाचे आणि शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असलेले खोडाळा मंडळ कृषी अधिकारी कार्यालय मोडकळीस आलेले आहे.येथील कर्मचार्‍यांना जीव मुठीत घेवून कार्यालयीन कामकाज करावे लागत आहे.प्रस्तुत कार्यालयाची ईमारत कधीही जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर असल्याने परिसरातील रहिवाशांच्या जीवीतालाही धोका होणार असल्याने सदर ईमारतीची तात्काळ डागडुजी करण्याची मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

मोखाडा तालुका कृषी कार्यालयांतर्गत येणार्‍या खोडाळा मंडळ कार्यालयातून परिसरातील ३० हून अधिक गावांतील शेतीविषयक कामकाज तसेच ईतरही अनेक विकास कामे केली जातात. त्यामुळे येथे शेतकर्‍यांचा मोठ्या प्रमाणावर राबता असतो.त्याचबरोबर शेतीविषयक मार्गदर्शन शिबीरे , मिटींग , दैनंदिन कामे इत्यादी कामे करतांना भेगा पडलेल्या भिंतीकडे पाहून कर्मचार्‍यांना नैमित्तीक कामांचा निपटारा करावा लागत आहे.

मंडळ कृषी अधिकारी कार्यालयाची अवस्था अतिशय भयानक झालेली असून भिंतीसह छप्परावरही मोठे झाड उगवलेले आहे.या झाडाच्या मुळ्या थेट भिंत पोखरून कार्यालयात डेरेदाखल झालेल्या आहेत.त्यामुळे इमारतीचा धोका आणखीनच वाढलेला आहे.बांधकाम विभागासह जिल्ह्याच्या वरिष्ठ कार्यालयांनी या धोकादायक इमारतीची व परिसरातील रहिवाशांच्या जीवीताची दखल घेवून इमारतीची तातडीने दुरूस्ती करण्याची मागणी परिसरातील रहिवाशांनी केलेली आहे.

शासन एकीकडे ठाणा-मुंबईच्या धोकादायक इमारतींची काळजी घेत असतांना दुसरीकडे मात्र ग्रामीण आदिवासींच्या जीवावर उठलेल्या धोकादायक शासकिय इमारती मात्र बेदखल ठेवीत आहे, असा आरोप परिसरातील रहिवासी यांनी केला आहे.

सण 1972 साली प्रशिक्षण व भेट योजना अमलात होती. त्यावेळी सदर ईमारत ही प्रशिक्षण व भेट योजनेकडे हस्तांतरित करण्यात आली होती. दरम्यानच्या 50 वर्षात या ईमारतीची कोणत्याही प्रकारची डागडुजी झालेली नाही. इमारतीच्या पश्चिमेकडील भिंतीवर मोठे झाड उगवले असून त्याची मुळे भिंतीत घुसली आहेत त्यामुळे सदर भिंत ही केव्हाही जमीनदोस्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजूलाच वस्ती असून खेटून असलेल्या घरांवर भिंतीचे अवशेष पडल्यास मोठ्या प्रमाणावर वित्त हानी होऊन संभाव्य जीवित हानी टाळता येणार नाही. त्यामुळे सदर इमारत तातडीने निष्काशीत करणे आवश्यक आहे.

 

सदर इमारत धोकादायक नाही.तसेच सदरची प्रक्रिया ही मोठी असून सध्यातरी तशी गरज नाही.

– अजय गायकवाड
उपअभियंता (प्रभारी)
जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग मोखाडा


Edited By Roshan Chinchwalkar