घरपालघरपालघर येथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप

पालघर येथे रस्त्याच्या कामात भ्रष्टाचाराचे आरोप

Subscribe

प्रकाश टॉकीज ते आर्यनशाळेपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करून साईड पट्टी व त्यावर काँक्रीट गटार करण्यासाठी २१ जुलै २०१७ च्या नगर परिषदेच्या सभेत प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती. तसेच सप्टेंबर २०१८ च्या स्थायी समिती सभेत फेरनिविदा काढण्याबाबत ठराव मंजूर होता.

पालघर: पालघर नगरपरिषदेच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप पालघर नगर परिषदेच्याच एका नगरसेवकाने केला आहे. पालघर नगर परिषद हद्दीतील प्रकाश टॉकीज ते आर्यन शाळेपर्यंतच्या सिमेंट काँक्रीट साईड पट्टीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप पालघर नगरपरिषदेच्या नगरसेवक अरुण माने यांनी केला आहे. पालघर शहरातील प्रकाश टॉकीज ते आर्यन शाळेपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून त्यावर गटार उभारण्याचे काम अपूर्ण असताना तसेच कामाचा दर्जा अंदाजपत्रक व निविदेमध्ये नमूद केलेल्या प्रमाणे झाला नसताना प्रत्यक्ष काम झाल्याच्या सुमारे दोन वर्षांपूर्वीच्या काम पूर्णत्वाचा दाखला दाखवून देयके अदा करण्यात आलेली आहे. या प्रकरणात आर्थिक व्यवहार व अनियमितता झाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत. प्रकाश टॉकीज ते आर्यनशाळेपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करून साईड पट्टी व त्यावर काँक्रीट गटार करण्यासाठी २१ जुलै २०१७ च्या नगर परिषदेच्या सभेत प्रशासकीय मंजूरी देण्यात आली होती. तसेच सप्टेंबर २०१८ च्या स्थायी समिती सभेत फेरनिविदा काढण्याबाबत ठराव मंजूर होता.

सुमारे २५० ते ३०० मीटर लांबीच्या या रस्त्याचे काम प्रत्यक्षात फेब्रुवारी-एप्रिल २०२२ मध्ये हाती घेण्यात आले होते. मात्र हे काम १७ एप्रिल २०१९ या कोविड पूर्वकाळात पूर्ण झाल्याचे दाखवून देयके अदा करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे कामात वापरत आलेला कच्चा माल तसेच काम पूर्ण झाल्याचा दर्जा तपासणीचा अहवाल तब्बल २९ महिन्यांनी नगरपरिषदेकडे सादर केला गेल्याचे आढळून आले आहे. हे काम करताना आवश्यक खोदकाम झाले नसल्याचे तसेच सहा ते आठ इंच जाडीचा थर काँक्रीटवर टाकण्यापेक्षा त्यापेक्षा पातळ थर अंथरूण रस्त्याच्या कामामध्ये हलगर्जीपणा केल्याचे आरोप होत आहेत. त्याच पद्धतीने एम-३० दर्जाचे सिमेंट काँक्रीट वापरणे अपेक्षित असताना एम-२० दर्जाचे रेडीमिक्स वापरल्याचा देखील आरोप होत आहेत.
तसेच रस्ता रुंदीकरण व गटार उभारणी याची संयुक्त निविदा प्रसिद्ध असताना फक्त रुंदीकरणाच्या कामासाठी सुमारे ३४ लाख ५० हजार रुपयांची देण्यात देण्यात आले असून रस्त्याची रुंदी व दर्जा यामध्ये प्रकार झाल्याचे आरोप नगरसेवक अरुण माने यांनी केले आहेत. विशेष म्हणजे नगरपरिषदेकडून झालेला गैरप्रकार झाकण्यासाठी नव्याने सुमारे अडीच कोटी रुपयांची नवीन निविदा काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात पालघरचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पवार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -