घरपालघरसमुद्रातून आणलेल्या माशांच्या विक्रीसाठी ४ जूनपर्यंत मुभा द्या

समुद्रातून आणलेल्या माशांच्या विक्रीसाठी ४ जूनपर्यंत मुभा द्या

Subscribe

त्यानुसार शासनाच्या या आदेशाचे पालन करणार असल्याची हमी मच्छिमार संघटनेकडून दिली जात आहे.

भाईंदर :- शासनाच्या आदेशानुसार ३१ मेनंतर मासेमारी बंदी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यानंतर पुढील चार दिवस म्हणजे ४ जूनपर्यंत बोटीतून मासे काढून मासे विक्री परवानगी देण्याची मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीकडून शासनाकडे करण्यात आली आहे. यामुळे मच्छिमारांच्या जाळ्याला घावलेल्या मासळीला योग्य भाव मिळून मच्छीमारास मदत होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. शासनाकडून येत्या १ जूनपासून पुढील दोन महिने मासेमारीवर बंदी घालण्यात येत असल्याचे आदेश ठाणे-पालघर जिल्ह्याच्या मत्स्य व्यवसाय आयुक्तांकडून मच्छिमारांना देण्यात आले आहेत. या कालावधीत मासळी विक्रीवर सुद्धा बंदी घालण्यात आली आहे. त्यानुसार शासनाच्या या आदेशाचे पालन करणार असल्याची हमी मच्छिमार संघटनेकडून दिली जात आहे.

मात्र मासेमारी बंदी पूर्वी ३० मे रोजी किनार्‍यावर मोठ्या प्रमाणात बोटी येणार आहेत. त्यामुळे त्यात असलेली मासळी एकाच वेळी बाजारात विक्रीसाठी आल्यास तिच्या दरात घसरण होऊन मासळींना योग्य भाव मिळणार नसल्याची दाट शक्यता आहे. परिणामी मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान होईल. त्यामुळे मासेमारी बंदी करण्यात आली असली तरी मासळी बाजारात मासे विकण्यासाठी ४ जूनची मुदत देण्यात यावी, अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीकडून करण्यात आली असल्याची माहिती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी दिली आहे.

- Advertisement -

राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार पालघर जिल्ह्यात १ जून ते ३१ जुलैपर्यंत मासेमारी करण्यास बंदी लागू करण्यात आली आहे. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणार्‍या बिगर यांत्रिकी नौकांना लागू राहणार नाही. राज्याच्या सागरी क्षेत्रामध्ये १ जून ते ३१ जुलै कालावधीत मासळीच्या जिवांना प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. या कालावधीत मासेमारी बंदीमुळे मासळीच्या बिजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. तसेच या कालावधीत खराब आणि वादळी हवामानामुळे होणारी मच्छिमारांची जीवित व वित्तहानी टाळता येणे शक्य होते. त्यामुळे या कालावधीत यांत्रिक मासेमारी नौकास मासेमारी बंदी लागू करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -