HomeपालघरAnganwadi: तलासरी आणि डहाणू तालुक्यात अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त

Anganwadi: तलासरी आणि डहाणू तालुक्यात अंगणवाडी मदतनीस पदे रिक्त

Subscribe

बालकांसाठी पोषण आहार शिजवणे, आरोग्य तपासणी, पोलिओ लसीकरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

डहाणू : तलासरी आणि डहाणू तालुक्यातील अंगणवाडी मदतनीस पदे गेल्या काही महिन्यांपासून रिक्त असून, विधानसभा निवडणुकीमुळे भरती प्रक्रिया अर्धवट थांबली आहे. यामुळे अंगणवाड्यांचे कामकाज विस्कळीत झाले असून, बालकांचे आरोग्य आणि पोषण यावर मोठा परिणाम होत आहे. तलासरी तालुक्यात सध्या ५३ मदतनीस पदे रिक्त आहेत, तर डहाणू तालुक्यातील कासा आणि डहाणू प्रकल्पांतर्गत २०९ पदे रिक्त असून, एकूण २६२ पदांची भरती रखडली आहे. या रिक्ततेमुळे मुख्य सेविकांवर प्रचंड कामाचा भार पडत आहे. बालकांसाठी पोषण आहार शिजवणे, आरोग्य तपासणी, पोलिओ लसीकरण यांसारख्या महत्त्वाच्या कामांवर प्रतिकूल परिणाम होत आहे.

तालुक्यातील अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराच्या व्यवस्थेमध्ये अडचणी निर्माण झाल्या असून, बालकांची आरोग्य तपासणी नियमित होण्यात अडथळे येत आहेत. यामुळे कुपोषणाचे प्रमाण भविष्यात वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील बालकांचे पालक व नागरिकांकडून सरकारकडे मागणी होत आहे की, रखडलेली मदतनीस पदांची भरती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. ही प्रक्रिया रखडल्यामुळे गरोदर माता, स्तनदा माता आणि बालकांना योग्य ती सेवा मिळण्यास विलंब होत आहे.सध्या मुख्य सेविकांवर कामाचा प्रचंड ताण असून, परिणामी अंगणवाड्यांचे नियोजन आणि कामकाज विस्कळीत झाले आहे. या परिस्थितीत लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू झाली नाही तर कुपोषणाच्या समस्या गंभीर रूप धारण करतील, असा इशारा स्थानिकांनी दिला आहे.तलासरी आणि डहाणूतील अंगणवाडी सेवांचे काम सुरळीत करण्यासाठी आणि बालकांचे आरोग्य आणि पोषण सुनिश्चित करण्यासाठी या समस्येकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

- Advertisement -

 

“विधानसभा निवडणुकी दरम्यान अंगणवाडी मदतनीस पदांची भरती प्रक्रिया स्थगिती देण्यात आल्याने , या संदर्भात लवकरच शासन निर्णय आदेश आल्यावर रिक्त पदांची भरती होईल”.

- Advertisement -

– उज्वला नांगरे , बाल विकास परियोजना प्रकल्प अधिकारी, तलासरी

 

“मदतनीस विना मुख्य सेविका यांच्यावर जास्तीची जबाबदारी आल्याने गरोदर माता , बालक यांच्या आरोग्य , पोषण आहार यावर परिणाम होत आहे, लवकरात लवकर भरती प्रक्रिया करून कामकाज सुरळीत व्हावे”

ृ-स्वपन्ना भूरकुड, माता (गृहिणी)

 

“डहाणू प्रकल्पातील एकूण १२६ पदे रिक्त आहेत. विधानसभा निवडणुकी दरम्यान भरती प्रक्रिया रखडली, निवडणूक आल्याने स्थगिती देण्यात आली आहे, शासनाच्या आदेशानुसार लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू होईल.”

– सतीश पोल , बाल विकास परियोजना अधिकारी, डहाणू अंगणवाडी प्रकल्प


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -