घरपालघरअनिता संचीव पाटील यांचे निधन

अनिता संचीव पाटील यांचे निधन

Subscribe

अनिता पाटील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्या एक उत्तम कॅरमपटू होत्या. त्यांच्या पार्थिवावर विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

वसई : अनिता संजीव पाटील (६३) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. अनिता पाटील खासगी बँकेत वरिष्ठ अधिकारी पदावरून निवृत्त झाल्या होत्या. त्यांचे पती संजीव पाटील विरारमधील विवा कॉलेजचे विश्वस्त आहेत. वसई- विरार महापालिकेचे प्रथम महापौर राजीव पाटील आणि स्थायी समितीचे माजी सभापती अजीव पाटील यांच्या मोठ्या वहिनी होत्या. आमदार हितेंद्र ठाकूर आणि आमदार क्षितीज ठाकूर यांच्याही त्या जवळच्या नातेवाईक होत्या.

अनिता पाटील सार्वजनिक क्षेत्रातील बँकेतून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्या एक उत्तम कॅरमपटू होत्या. त्यांच्या पार्थिवावर विरार येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. पती संजीव पाटील आणि चिरंजीव आर्चित पाटील पर्यावरणस्नेही आहेत. त्यांनी दाहसंस्काराच्यावेळी लाकडाने दहन करण्याऐवजी गॅस दाहिनीच्या माध्यमातून अंत्यसंस्कार केले. यामुळे धूर, लाकडे जाळणे, टायर व तत्सम ज्वलनशील पदार्थ जाळणे टाळता येते. म्हणूनच अनिता पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या अंत्यसंस्कार प्रक्रियेचे अनुकरण पर्यावरण दृष्टीकोनातून उपयुक्त ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -