घरपालघरआणखी एक सिरियल रेपिस्ट जेरबंद

आणखी एक सिरियल रेपिस्ट जेरबंद

Subscribe

रणवरे यांनी रेपिस्टला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. घटनास्थळावरून पळून जात असलेल्या आरोपाचा सीसीटीव्हीत कैद झालेले अस्पष्ट फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केली होती.

वसईः मंगळवारी दुपारी नालासोपाऱ्यातील एका सात वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिरियल रेपिस्टला मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा दोनच्या पथकाने सूरत शहरातून अटक केली. या रेपिस्टने चार महिन्यांपूर्वी नालासोपारा पुर्वेकडील ओसवाल नगरीतील  बाबा संकुलातील एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलीस तपासात उजेडात आले आहे. मंगळवारी दुपारी आचोळे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका सात वर्षीय मुलीचे तिच्याच इमारतीच्या आवारातून अपहरण करून इमारतीच्या गच्चीवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे तपास करत होते. रणवरे यांनी रेपिस्टला पकडण्यासाठी वेगवेगळी पथके तयार केली होती. घटनास्थळावरून पळून जात असलेल्या आरोपाचा सीसीटीव्हीत कैद झालेले अस्पष्ट फोटोच्या माध्यमातून पोलिसांनी माग काढण्यास सुरुवात केली होती.

सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपीची ओळख पटवण्यात यश मिळाल्यानंतर पोलिसांनी तो रहात असलेल्या नालासोपारा एसटी डेपो झोपडपट्टी आणि डोंबवली येथे शोध घेतला तेव्हा आरोपीचा मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला. त्यावरून त्याचे लोकेशन शोधण्यात आले. त्यावरून आरोपी अजमेर एक्सप्रेस ट्रेनने सूरत शहरात उतरल्याचे दिसून आले. त्यानंतर रणवरे यांनी सूरत शहर पोलीसांच्या गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपीला सूरत शहरातून अटक केली. पोलीस तपासात आरोपीने चार महिन्यांपूर्वी नालासोपारा पूर्वेकडील ओसवाल नगरीत असलेल्या बाबा संकुलातील एका सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची कबुली दिली. तेव्हापासून आरोपी पसार झाला होता. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल आहे.

- Advertisement -

दरम्यान, ऑक्टोबर २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सिरियल रेपिस्टने वसईत दहशत पसरली होती. दोन रेपिस्ट अल्पवयीन शाळकरी मुलींना किंवा घराबाहेर खेळत असलेल्या मुलींचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याआरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी बक्षिस जाहिर करून त्यांची छायाचित्रेही लावली होती. यातील विशाल कनोजिया या रेपिस्टला गुन्हे शाखा तीनच्या पथकाने उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या मदतीने वाराणसी येथील केंट रेल्वे स्टेशन परिसरातून अटक केली होती. तर दुसऱ्या रेपिस्टचा पोलीस शोध घेत असतानाच त्यांने मंगळवारी चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. याआधी नालासोपाऱ्यात रेहान कुरेशी नावाच्या रेपिस्टने शाळकरी मुलींवर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी तीन मुलींनी दिलेल्या तक्रारीवरून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुन्हे शाखेने अटक केल्यानंतर त्याने मीरा रोड, भाईंदर, नवी मुंबई, मुंबई परिसरात दोनशेहून अधिक मुलींवर अत्याचार केल्याचे उजेडात आले होते. 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -