घरपालघरअंतरा पाळणा लांबवतेय आणि आरोग्य राखतेय

अंतरा पाळणा लांबवतेय आणि आरोग्य राखतेय

Subscribe

विशेष म्हणजे ग्रामीण अतिदुर्गम भाग असताना देखील शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या समुपदेशाने अंतरामुळे तालुक्यातील महिलांचे आरोग्य देखील चांगले राहत आहे.

जव्हार: जिल्ह्यातील ग्रामीण आणि अतिदुर्गम भाग म्हणून ओळखला जाणार्‍या जव्हार तालुक्यात स्तनदामातेचे आरोग्य, कुपोषण व आर्थिक कुचंबना हा पूर्ण दुष्टचक्र लक्षात घेता कुटुंब नियोजनाच्या दृष्टीने पाळणा लांबविणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर पतंगशहा उपजिल्हा रुग्णालयात मागील चार वर्षात एक हजार पाचशे डोस अंतरा इंजेक्शनच्या माध्यमातून महिलांना मोफत दिल्याने पाळणा लांबविण्यासाठी फलदायी ठरले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण अतिदुर्गम भाग असताना देखील शिक्षणाच्या माध्यमातून आणि आरोग्य विभागाच्या समुपदेशाने अंतरामुळे तालुक्यातील महिलांचे आरोग्य देखील चांगले राहत आहे.
कुटुंबात पती अगर पत्नीला शस्त्रक्रिया न करता नको असलेल्या गर्भधारणेसाठी शासनाच्या आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन मोफत उपलब्ध आहे. एकदा इंजेक्शन घेतल्यानंतर तीन महिने गर्भधारणेची चिंता महिलांना राहणार नाही. लग्नानंतर पहिले अपत्य उशिरा हवे असल्यास किंवा दोन अपत्यांमध्ये अंतर ठेवण्यासाठी बर्‍याचदा महागड्या औषधांचा वापर केला जातो. मात्र, आता नको असलेल्या गर्भधारणेपासून सुटका मिळविण्यासाठी सोपा, सुरक्षित पर्याय उपलब्ध झाला आहे. महिलांना कुटुंब नियोजन करणे अधिक सोपे करण्यासाठी आरोग्य विभागातर्फे अंतरा इंजेक्शन उपलब्ध केले आहे. याचा लाभ तालुक्यातील महिला घेत आहेत. ही इंजेक्शन जव्हार तालुक्यातील पतंगशहा उपजिल्हा रुग्णालय आणि मोखाडा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय मोखाडा येथे मोफत उपलब्ध असून मातांनी तसेच महिलांनी या सोयीचा लाभ घेण्याचे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.

अंतरा इंजेक्शनचे लाभ
हे इंजेक्शन एकदा घेतल्यास तीन महिन्यांपर्यंत गर्भ राहणार नाही. अंतरा इंजेक्शनमुळे महिलांचा रक्तक्षयापासून बचाव होतो.अंतरा इंजेक्शन बंद केल्यानंतर गर्भधारणा होण्यास सात ते दहा महिन्यांचा कालावधी.अंतरा इंजेक्शनमुळे बीजांडाच्या कर्करोगापासून बचाव होतो. तसेच लैंगिक संबंधावर, प्रजनन क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही. 2022 या वर्षातील नऊ महिन्यांत जव्हार तालुक्यातील पतंग शहा उपजिल्हा रुग्णालय जव्हार येथे अंतरा इंजेक्शन लावून पाळणा लांबविणार्‍या महिलांची संख्या 411 इतकी आहे. दिवसेंदिवस ही संख्या वाढत आहे

- Advertisement -

कोट

पाळणा लांबवण्यासाठी इंजेक्शन अंतरा हे हार्मोनल इंजेक्शन दर तीन महिन्याने दिले जाते. बाळ 3-6 महिन्याचे झाल्यावर लगेच गर्भधारणा होऊ शकते. अशा वेळेस दर 3 महिन्यांनी इंजेक्शन घेणे रोज गोळ्या घेण्यापेक्षा जास्त सोयीस्कर आहे.हे इंजेक्शन घेण्याआधी स्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, तसेच परिणाम व दुष्परिणामांची सखोल माहिती घ्यावी.
डॉ. भरतकुमार महाले, स्त्री रोग तज्ञ तथा वैधकिय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय मोखाडा
&……………………………………………………………………………………….

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -