Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर पालघर नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेला मंजुरी

नगरपंचायतीच्या नळपाणी पुरवठा योजनेला मंजुरी

Subscribe

या योजनेच्या माध्यमातून शुद्ध - मुबलक प्रमाणात व दररोज पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे मोखाडा वासीयांची दुडी- कावडीने पाणी घेण्याची डोकेदुखी थांबणार आहे.

मोखाडा : मोखाडा नगरपंचायत क्षेत्रासाठी बहुप्रतिक्षित व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला आज अखेर मंजुरी देण्यात मिळाली आहे. 34.77 कोटी रुपये एवढ्या मोठ्या स्वरूपात निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.त्यामुळे मोखाडा शहर व नगरपंचायत क्षेत्रातील सर्व 12 गावपाडे या योजनेत समाविष्ट करण्यात आले असून या योजनेमुळे संपूर्ण नगरपंचायतीतील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.या योजनेच्या माध्यमातून शुद्ध – मुबलक प्रमाणात व दररोज पाणी उपलब्ध होणार असल्यामुळे मोखाडा वासीयांची दुडी- कावडीने पाणी घेण्याची डोकेदुखी थांबणार आहे.

या बाबत मोखाडा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष अमोल पाटील यांनी सांगितले की,गेले कित्येक वर्षे या योजनेचा पाठपुरावा केला जात होता. परंतु शासनाच्या जाचक अटी शर्ती पूर्ण करणे, त्यात अगदी जागा उपलब्ध करणे , पाणी आरक्षण , आदिवासी उपयोजनेत समाविष्ट करणे , फिल्टर प्लॅन्टसाठी जागा , घनकचरा व्यवस्थापन , इत्यादी अनेक बाबींचा मागील काही वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. जिल्हा परिषद , जिल्हाधिकारी कार्यालय, नगरविकास विभाग,महसूल विभाग, आदिवासी विकास विभाग, पाणी पुरवठा विभाग,वित्त विभाग या कार्यालयात सातत्याने पाठपुरावा केला जात होता.मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने आणि आमच्या चिकाटीच्या प्रयत्नाने यश मिळाले आहे. तसेच मोखाड्याची पाणी टंचाई लक्षात घेऊन तशी ती कायमचीच सोडवण्याचे अभिवचन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिले होते.त्यांनी दिलेला शब्द पूर्ण करत आम्हाला ही योजना मंजूर करुन दिली आहे,असे पाटील म्हणाले.
यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्री महोदयांचे मोखाडा नगरपंचायत व नगरपंचायतच्या तमाम जनतेच्या वतीने आभार मानले आहेत. तसेच पालकमंत्री रविंद्र चव्हाण ,नामदार दादाजी भुसे ,संपर्क प्रमुख आमदार रविंद्र फाटक,जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भाऊ भुसारा, खासदार राजेंद्र गावित ,जिजाऊ संघटेचे अध्यक्ष निलेश सा़ंबरे , उपनगराध्यक्ष नवसु दिघा यांनी या कामी वेळोवेळी मार्गदर्शन व सहकार्य केले आहे.त्यामुळे योजना मंजूर करण्यात यश मिळाले असल्याचे पाटील यांनी नमूद केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -