घरपालघररिक्षाचालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप; पूर्वीप्रमाणेच दर आकारण्याचे आरटीओचे आदेश

रिक्षाचालकांच्या मनमानी भाडेवाढीला चाप; पूर्वीप्रमाणेच दर आकारण्याचे आरटीओचे आदेश

Subscribe

कोरोना काळातील वाढीव रिक्षा दर रद्द करून पूर्वीप्रमाणे तीन प्रवाशी बसवून टप्प्यानुसार जसे भाडे पूर्वी घेतले जात होते. त्याप्रमाणे प्रतीप्रवाशी मागे भाडे रिक्षाचालकांनी घ्यावे, असे निर्देश वसई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिले आहेत.

कोरोना काळातील वाढीव रिक्षा दर रद्द करून पूर्वीप्रमाणे तीन प्रवाशी बसवून टप्प्यानुसार जसे भाडे पूर्वी घेतले जात होते. त्याप्रमाणे प्रतीप्रवाशी मागे भाडे रिक्षाचालकांनी घ्यावे, असे निर्देश वसई उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिले आहेत. वसई-विरारमधील रिक्षाचालकांनी केलेल्या मनमानी भाडेवाढीविरोधात वसई-सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रिक्षावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वसई यांच्या दालनात सोमवारी सायंकाळी प्रवासी व रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत हे निर्देश देण्यात आले. विरार स्टेशन ते मनवेलपाडा तीन प्रवासी बसवून प्रती प्रवासी दहा रुपये घ्यावेत, असा निर्णय झाला आहे. तसेच चौथ्या सीटवर प्रवाशांनी बसू नये, असे आवाहन प्रवाशी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी प्रवाशी वर्गाला करावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

रिक्षाचालकांकडून वारंवार आवाहन करण्यात येत असतानाही प्रवाशी स्वेच्छेनेरि क्षाचालकाच्या कडेला चौथा प्रवाशी म्हणून बसत असल्याचे अनेक रिक्षा चालकांकडून सांगण्यात येते. चौथ्या सीटवर बसू नये, असे सांगितल्यास रिक्षाचालक आणि प्रवाशी यांच्यात अनेकदा वाद होतात. ही बाब रिक्षाचालक संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी परिवहन अधिकार्‍यांच्या बैठकीत निदर्शनास आणली. एखादा रिक्षाचालक प्रवाशासोबत दादागिरी करून निश्चित दरापेक्षा जास्त भाडे वसूल करत असेल, तर संबंधित वाहतूक शाखा, स्थानिक पोलीस ठाणे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वसई अथवा रिक्षा संघटना प्रतिनिधी यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे रिक्षा संघटनेकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

 

या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले, वाहतूक पोलीस निरीक्षक शेखर डोंबे, दादाराम कारंडे, प्रवासी संघटना सेक्रेटरी यशवंत जडयार, उपाध्यक्ष अनिल मोरे, ऑटो रिक्षा टॅक्सी चालकमालक महासंघ पालघरचे अध्यक्ष विजय खेतले, मधुसूदन राणे, शरद जलगावकर, महेश कदम उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा –

‘काँग्रेसला ना इज्जत, ना किंमत’; आशिष शेलारांची बोचरी टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -