घरपालघरभाजपच्या दोन गटात वाद

भाजपच्या दोन गटात वाद

Subscribe

सदर बैठक ही गुरुवारी संध्याकाळी मिरारोडच्या जुना गोल्डन नेस्ट येथील ब्लु-मुन क्लब येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार नरेंद्र मेहता व रवी व्यास यांच्या गटातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

भाईंदर :- येत्या काळातील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता काळात राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्याच अनुषंगाने भाजप प्रभारी जे.पी. ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. त्यात नरेंद्र मेहता आणि रवी व्यास अशा दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शिमग्या आधीच मीरा -भाईंदर भाजपमध्ये बोंबाबोंब सुरू झाली. यात दोन गटात मध्यस्थी करणार्‍या भाजप जिल्हाध्यक्ष किशोर शर्मा यांनाही धक्काबुक्की झाली असल्याचे व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. तर शहरात भाजपचे मागच्या पाच वर्षांपासून दोन गट कार्यरत असून ते सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्यात मीरा भाईंदर प्रभारी हे सातत्याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असतात. तो वाद मात्र आता शिमग्या आधीच शिगेला पोहोचला आहे. येत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मीरा- भाईंदरमधील भाजप पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची विशेष बैठक गुरुवारी कार्यकारणीने बोलावली होती. या बैठकीला मीरा- भाईंदर भाजपचे प्रभारी जे. पी. ठाकूर उपस्थितीत राहणार होते. सदर बैठक ही गुरुवारी संध्याकाळी मिरारोडच्या जुना गोल्डन नेस्ट येथील ब्लु-मुन क्लब येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत माजी आमदार नरेंद्र मेहता व रवी व्यास यांच्या गटातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी मीरा- भाईंदर विधानसभा प्रमुख अ‍ॅड. रवी व्यास यांना सन्मान न देता डावलल्याचा आरोप करीत त्यांचे समर्थक काही प्रमाणात संतप्त झाले होते. काही वेळाने हे संतप्त कार्यकर्ते थेट मंचावर चढले. हे पाहून नरेंद्र मेहता समर्थक देखील आक्रमक झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -