Eco friendly bappa Competition
घर पालघर वसईत चामढोक या करकोचा जातीच्या पक्ष्याचे आगमन

वसईत चामढोक या करकोचा जातीच्या पक्ष्याचे आगमन

Subscribe

वजन सुमारे तीन किलो असून त्याची उंची ९५ ते १०० सेंटीमीटर असते. उडताना पंखांच्या बाजूची लांबी १५० ते १६० सेंटीमिटर इतकी भरते.

वसईः सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या चामढोक (चित्रबलाक) या पक्षाचे वसईतील पाणजू बेट गावातील जेटी परिसरात आगमन झाले आहे. पिंगलाक्ष आणि कंठसारंग या नावानेही हा पक्षी परिचित आहे.
पाणजू बेट गावाच्या जेटी परिसरात सध्या चामढोक फिरताना गावकर्‍यांच्या नजरेत पडत आहेत. चित्रबालक, पिंगलाक्ष, कंठसारंग अशा विविध नावाने ओळख असलेल्या चामढोकचे वजन सुमारे तीन किलो असून त्याची उंची ९५ ते १०० सेंटीमीटर असते. उडताना पंखांच्या बाजूची लांबी १५० ते १६० सेंटीमिटर इतकी भरते.

चामढोकची चोच पिवळ्या रंगाची, टोकाकडे किंचित बाकदार, मोठी आणि लांब असून याचा चेहरा पिवळा असतो. त्यावर पिसांचा अभाव, उर्वरित सर्वांगावर पांढरी पिसे आणि त्यावर हिरवट काळ्या खुणा, पंख गुलाबी असून छातीवर आडवा काळा पट्टा असतो. चित्रबलाक नर-मादी दिसायला सारखेच असतात. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ, बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये चित्रबलाक रहिवासी आणि स्थानिक स्थलांतर करणारा पक्षी आहे. दलदली, सरोवरे, भाताच्या शेतीचा प्रदेश अशा ठिकाणी दिवसभर पाण्यात उभा राहून चित्रबलाक हा मासोळ्या, बेडूक, साप, गोगलगाय वगैरे पाण्यातील जीव खातो. चामढोक पक्षी सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. सध्या स्थलांतरीत झालेले चामढोक पाणजू परिसरात दिसून येत असल्याची माहिती पक्षीनिरीक्षक देवेंद्र भोईर यांनी दिली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -