घरपालघरसूर्या कालव्यात सोडलेली राख कुणाची?

सूर्या कालव्यात सोडलेली राख कुणाची?

Subscribe

डहाणू तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्यात केमिकलयुक्त राख सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

डहाणू तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर चारोटी येथे सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्यात केमिकलयुक्त राख सोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका कंपनीच्या राख वाहून नेणाऱ्या वाहनांपैकी एका वाहनचालकाने आपल्या टँकरमधील राख पाईपच्या साहाय्याने कालव्याच्या महामार्गाच्या खाली असलेल्या भागात सोडली आहे. राख खाली करून आल्यावर टँकरमधील उललेली राख कालव्यात सोडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

- Advertisement -

सोमवार ३० मे रोजी पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रवीण भुसारे या परिसराची पाहणी करत असताना दुपारच्या सुमारास सूर्या प्रकल्पाच्या उजव्या तीर कालव्याच्या महामार्गाखालील लाईनमध्ये एका वाहनातून राख सोडली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले असता त्यांनी वाहनांची चौकशी केली. टँकर क्रं. एम. एच-०४ वाय-६२७२ चा वाहन चालक आपल्या टँकरमधील राख पाईपच्या सहाय्याने कालव्यात सोडत असल्याचे त्यांनी पाहिले. वाहनचालकाला विचारपूस केली असता त्यांनी शिवराळ भाषेचा वापर करत उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे भुसारे यांनी कासा पोलीस स्टेशनला संपर्क करून संबंधितांवर गुन्हा दाखल केला. टँकर चालक हंसराज नारायण (३६), टँकर चालक नीरज राजपूत (३१) व क्लिनर अरविंद यादव यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे.

हा टँकर डहाणू येथील अदानी थर्मल पावर येथून राखेची वाहतूक करत असल्याचे सांगितले जात होते. परंतु सदर टँकरचा अदानी कंपनीशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्टीकरण अदानी थर्मल पावर कंपनीकडून देण्यात आले आहे. त्यामुळे आता नेमकी ही राख कोणाची आहे व ती कालव्यात का सोडण्यात येत होती, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. पोलीस चौकशीत नेमके काय बाहेर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

- Advertisement -

(कुणाल लाडे ः लेखक डहाणूचे वार्ताहर आहेत.)

हेही वाचा –

पालिका कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिले मंजूर करा; कर्मचारी कामगार सेनेची मागणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -