घरपालघरडांबरीकरणाच्या कामातून डांबर गायब

डांबरीकरणाच्या कामातून डांबर गायब

Subscribe

या आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्याचे वेगवेगळे टप्पे करून ते वेगवेगळ्या ठेकेदारांना कामे वाटप केली आहेत.

वाडा: देसई ते खर्डी या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू असून या रस्त्याच्या कामातील काही टप्पे अत्यंत निकृष्ट बनविले जात आहेत. डांबरीकरणाच्या कामात डांबर न वापरता दगड पावडरमध्ये काळे तेल भेसळ करून रस्ते बनविले जात आहेत. त्यामुळे सोनाळे येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष उप अभियंता यांनाच निकृष्ट काम दाखवून काम बंद पाडले आहे. देसई ते खर्डी या रस्त्याची खूपच दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या या दुरवस्थेबाबत वाडा पूर्व विभागातील नागरिकांनी अलिकडेच मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेऊन रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी होण्यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाने रस्त्याचे वेगवेगळे टप्पे करून ते वेगवेगळ्या ठेकेदारांना कामे वाटप केली आहेत.

काही ठेकेदारांकडून घाईगडबडीने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. सोनाळे येथील ग्रामस्थांनी या डांबरीकरण कामाची पाहणी केली असता डांबरणाऐवजी दगड पावडरमध्ये काळे तेल वापरल्याचे उघडकीस आणले. हे निकृष्ट काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडाचे उप अभियंता संजय डोंगरे यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी नेऊन दाखविले. त्यांनीही या कामात डांबराचे प्रमाण कमी असल्याचे मान्य केले.संबंधित ठेकेदारावर या निकृष्ट कामाबाबत निश्चितच कारवाई केली जाईल, असे उप अभियंता डोंगरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -