Eco friendly bappa Competition
घर पालघर सहाय्यक लेखाधिकारी लाच घेताना ताब्यात

सहाय्यक लेखाधिकारी लाच घेताना ताब्यात

Subscribe

ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी ठेकेदाराने अँटीकरप्शनकडे तक्रार केली होती.

वसईः पालघर जिल्हा परिषदेतील सहाय्यक लेखाधिकार्‍याला ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना दुपारी कार्यालयात अँटीकरप्शनच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. रमेश यशवंत मौळे असे त्याचे नाव आहे. जव्हार तालुक्यातील ग्रामपंचायत कासटवाडीपैकी रामनगर येथे नळ पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराने केले आहे. त्या कामाचे बिल पास करून घेण्यासाठी रमेश मौळे यांनी ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांची मागणी केली. याप्रकरणी ठेकेदाराने अँटीकरप्शनकडे तक्रार केली होती.

तक्रारीची शहानिशा करून पोलीस उपअधिक्षक दयानंद गावडे, पोलीस निरीक्षक शिरीष चौधरी, पोलीस हवालदार अमित चव्हाण, दीपक सुमाडा, विलास भोये, नितीन पागधरे, निशिगंधा मांजरेकर, स्वाती तारवी आणि जितेंद्र गवळी यांच्या पथकाने सहाय्यक लेखाधिकारी यांच्या कार्यालयात सापळा रचला होता. दुपारी पावणेतीनच्या सुमारास मौळे यांनी तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच घेताना त्यांना पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -