Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरAttack On Police: वाहतूक नियंत्रणावेळी पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला

Attack On Police: वाहतूक नियंत्रणावेळी पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला

Subscribe

या दोघांनी हवालदाराशी हुज्जत घालून पोलीस गणवेशावरील बक्कल नंबरची नेमप्लेट तोडून हिसकावली आणि पार पाडत असलेल्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला,अशी तक्रार आहे.

भाईंदर : भाईंदर भाईंदर पश्चिमेला उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या ठिकाणी वाहतूक नियंत्रित करत असताना एका दुचाकी चालकाला विना हेल्मेट तसेच कागदपत्रांची विचारणी केल्यानंतर दुचाकी चालक आणि त्याच्या साथीदाराने कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचार्‍यावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस हवालदार गणेश ताटे हे भाईंदर पश्चिमेला उड्डाणपुलाजवळील मॅक्सेस मॉल नाका येथे वाहतूक नियंत्रनाचे काम करत होते. त्याच ठिकाणी दुचाकीवरून विना हेल्मेट जात असताना पोपटलाल जैन (वय-६९ वर्षे )आणि मयंक जैन (वय २८) यांना अडवण्यात आले. या दोघांनी हवालदाराशी हुज्जत घालून पोलीस गणवेशावरील बक्कल नंबरची नेमप्लेट तोडून हिसकावली आणि पार पाडत असलेल्या शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण केला,अशी तक्रार आहे. याप्रकरणी या दोन्हीही आरोपींच्या विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १३२, १२१ (२), ११७ (२), ११५ (२), ३५२, ३५१ (२) व ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सदरील गुन्ह्याचा तपास भाईंदर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आनंदराव काळे हे करत आहेत. तर सध्या दोन्हीही आरोपी फरार असून त्या आरोपींचा शोध सुरू आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -