घरपालघरभविष्याच्या चिंतेमुळे बहिणींनी उचलले टोकाचे पाऊल; एकीची आत्महत्या, तर दुसरी...

भविष्याच्या चिंतेमुळे बहिणींनी उचलले टोकाचे पाऊल; एकीची आत्महत्या, तर दुसरी…

Subscribe

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भविष्याची चिंता उभी राहिल्याने दोन बहिणींनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या बहिणीने मंगळवारी नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली.

वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भविष्याची चिंता उभी राहिल्याने दोन बहिणींनी स्वतःचे आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. मोठ्या बहिणीने मंगळवारी नवापूर समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. त्यानंतर बुधवारी लहान बहिणीने नवापूरच्याच समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, स्थानिकांनी तिला वाचवल्यानंतर एका कुटुंबाची वाताहत झाल्याची मन हेलावून टाकणारी कहाणी समोर आली आहे.

विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी परिसरातील अग्रवाल ब्रुक्लिन पार्क या इमारतीत नागपूर येथील ७२ वर्षीय हरिदास साहकार, ६५ वर्षींची पत्नी आणि मुलगी विद्या (४०) आणि स्वप्नल (३६) यांच्यासह आठ दिवसांपूर्वीच भाड्याने रहावयास आले होते. हरिदास रेशनिंग विभागातून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले असून संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह त्यांच्या पेन्शनच्या पैशावरच होत असे. १ ऑगस्टला हरिदास यांचे घरीच निधन झाले. वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्याचा संशय पत्नी आणि दोन मुलींना होता. बिल्डिंगमध्ये ही बातमी गेल्यास घर रिकामे करायला सांगतील किंवा क्वारंटाईन रहावे लागेल, या भितीपोटी तिघांनीही हरिदास यांचा मृतदेह घरात बेडवरच ठेवला होता. मृतदेहाचा वास बाहेर पडू नये, यासाठी डांबर गोळी, कापूर, अगरबत्ती लावून कुटुंबिय घरातच भितीच्या छायेखाली वावरत होते.

- Advertisement -

दरम्यान, वडिलांचे निधन झाल्यानंतर आईने वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय मुलींना सांगितला. त्यामुळे दोन्ही मुलींना भविष्याची चिंता भेडसावू लागली. वडिलांची पेन्शन आईला मिळणार, मग आपले काय होणार ही चिंता विद्या आणि स्वप्नल यांना भेडसावू लागली. त्यातून मार्ग काढण्यासाठी दोघींनीही आपापले जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी घरातच गोळ्या आणि हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण त्यात सुदैवाने यश न आल्याने समुद्रात आत्महत्या करण्याचा निर्णय दोघींनी घेतला. ही गोष्ट दोघींनीही आईपासून लपवून ठेवली होती.

मात्र, विद्याने मंगळवारी घरातून एकटीने पळ काढून अर्नाळाजवळील नवापूर समुद्रात उडी घेऊन आत्महत्या केली. विद्या घरी परत न आल्याने बुधवारी स्वप्नलही आत्महत्येसाठी घराबाहेर पडली. तिने नवापूर समुद्रात आत्महत्येचा प्रयत्न केला. पण, स्थानिकांनी तिला वाचवले. त्यानंतर स्वप्नलला अर्नाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तपासात मन हेलावून टाकणारी ही कहाणी समोर आली. पोलिसांनी त्यांच्या घरी जाऊन हरिदास यांचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

पत्रकारांना लोकल प्रवासाची अनुमती नाही? हायकोर्टाने व्यक्त केले आश्चर्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -