घरपालघरबेवारस वाहनांचा होणार लिलाव

बेवारस वाहनांचा होणार लिलाव

Subscribe

त्यामुळे सदर या वाहनाचे शासकिय मूल्यांकन प्रादेशिक परिवहन अधिकायार्‍यांकडुन करुन घेतले आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्यामध्ये बेवारस , गुन्हयातील,अपघातातील ,दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, वाहने मूळ मालकास परत करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आलेली आहेत. सदर वाहने पडताळणी करुन मूळ मालकाचा शोध घेवून ही ते न सापडल्याने किंवा विविध कारणास्तव परत न देता आल्याने बेवारस अवस्थेत अनेक वर्ष पडून आहेत. अशा वाहनांचा प्रत्यक्ष लिलाव केला जाणार आहे. तत्पूर्वी या बेवारस वाहनांबाबत आजपर्यंत कोणत्याही मालकाने वाहना बाबत दावा केलेला नाही. तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी विरार ता. वसई जि. पालघर यांच्याकडे उप्लब्ध वाहनाचे चेसीस, इंजीन, आरटीओ रजिस्ट्रेशन करुन पडताळणी केली असता सदर बेवारस उपलब्ध वाहनाचे कोणतेही तपशील सापडलेले नाहीत. त्यामुळे सदर या वाहनाचे शासकिय मूल्यांकन प्रादेशिक परिवहन अधिकायार्‍यांकडुन करुन घेतले आहे.

वाहन कोणाचे असल्यास, चोरीस गेले असल्यास अगर अपघातग्रस्त होवुन नादुरुस्त झाले असल्यास व ती वाहने घेवून जायची असल्यास त्या बाबत कासा पोलीस ठाणे व सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांचेशी संपर्क साधावा तसेच वाहनाचे कागदपत्र दाखवून खात्री करुन ती घेवून जावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -