घरपालघरउत्तर कार्यासाठी गेलेल्या जमावावर मधमाशांचा हल्ला

उत्तर कार्यासाठी गेलेल्या जमावावर मधमाशांचा हल्ला

Subscribe

तोंड धुवून त्याने पाणी डोक्यावरून उडवले ते पाणी तिथे असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर पडल्यानंतर हजारो मधमाशांनी त्याच्यावर हल्ला केला तो पळायला लागल्यावर मधमाशांनी त्याचा पाठलाग करत रस्त्यात जो सापडेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

पालघर: पालघर येथे मासवण नदीवर उत्तर कार्यासाठी गेलेल्या जमावावर मधमाशांनी अचानकपणे हल्ला केल्याने सर्वांची धावपळ उडाली. यामध्ये सुमारे 30 ते 35 जणांना मधमाशांनी डंख मारले असून दोघा जणांवर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाकीच्यांना उपचारानंतर घरी सोडून देण्यात आले. पालघर येथून मासवण येथे दहाव्याचे उत्तर कार्य करण्यासाठी मोठा जमाव गेला होता. यामध्ये सुमारे 200 च्या वर नातेवाईक, मित्रमंडळी, आप्तेष्ट तिथे हजर होते. तर कार्य संपण्याच्या वेळेस 50 ते 60 लोक तिथे उपस्थित होते. त्यातील एक व्यक्ती मासवण येथील जुन्या पुलाखाली हात पाय धुण्यासाठी नदीवर गेला. तोंड धुवून त्याने पाणी डोक्यावरून उडवले ते पाणी तिथे असलेल्या मधमाशांच्या पोळ्यावर पडल्यानंतर हजारो मधमाशांनी त्याच्यावर हल्ला केला तो पळायला लागल्यावर मधमाशांनी त्याचा पाठलाग करत रस्त्यात जो सापडेल त्याच्यावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

यामध्ये 30 ते 35 जणांवर मधमाशांनी हल्ला केला सुमारे 15 ते 20 मिनिटे विविध लोकांवर हा हल्ला सुरू होता. यामध्ये 70 वर्षीय वृध्द व्यक्तीस माशांनी कडाडून चावा घेतला . प्रशासनाने या अनपेक्षित मधमाशांच्या हल्ल्यांची दखल घेऊन तिथली पोळी काढून टाकावी जेणेकरून पुढे कधी उत्तर कार्याच्या विधीसाठी आलेल्या जमावावर असा अनर्थ घडू नये अशी मागणी तिथे आलेल्या नागरिकांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -