घरपालघरराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घंटानाद आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घंटानाद आंदोलन

Subscribe

यात युवक ,विद्यार्थी ,शेतकरी बेरोजगार ,महिला, कामगार ,अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नांना समोर ठेवून हे आंदोलन करण्यात आले.

डहाणू :  डहाणू तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष काशिनाथ चौधरी यांच्या नेतृत्वात आज १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने डहाणू तहसीलदार कार्यालयासमोर विविध मांगण्यासाठी घंटानाद / थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यात युवक ,विद्यार्थी ,शेतकरी बेरोजगार ,महिला, कामगार ,अंगणवाडी सेविका यांच्या प्रश्नांना समोर ठेवून हे आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्यांची भरपाई मिळावी ,अनेक ठिकाणी रिक्त असलेली पदे भरावीत, कंत्राटी पद्धतीची भरती रद्द करावी, दत्तक शाळा योजना रद्द करावी,  नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना प्राधान्य द्यावे, मराठा आरक्षण आणि इतर आरक्षण याबद्दल संभ्रम दूर करावा, थकीत शिष्यवृत्ती ताबडतोब मिळावी, वकील संरक्षण कायदे करावेत , या व अशा अनेक मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष तथा जि.प.सदस्य काशिनाथ चौधरी,डहाणू सभापती प्रविण गवळी,शहराध्यक्ष तन्मय बारी,महिला जिल्हाध्यक्ष कीर्ति मेहता,माजी सभापती स्नेहलता सातवी,विद्यार्थी जिल्हाध्यक्ष सुश्रुत पाटील,जि.सदस्य लतिका बालशी,पं.स.सदस्य पिंटी बोरसा,अरुण कदम,शैलेश हाडळ,सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -