घरपालघरकाळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती

काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथकांची नियुक्ती

Subscribe

सध्या २९२० मेट्रीक टन खत व ११००० क्विंटल बियाणे उपलब्ध असून शेतकर्‍यांनी काळजी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली.

पालघर: खरीप हंगाम जवळ येत असल्याने शेतकर्‍यांना बियाणे आणि खते वेळेवर उपलब्ध व्हावीत यासाठी पालघर कृषी विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे.बोगस खते व बियाणांची विक्री होऊ नये यासाठी जिल्हास्तरावर १ आणि प्रत्येक तालुकास्तरावर १ अशा एकूण ९ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना आगामी खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी मुबलक प्रमाणात खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी कृषी विभागाने सुरू केली असून यासाठी सूक्ष्म नियोजन केले जात आहे.शेतकर्‍यांची फसवणूक केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास अथवा कोणी आढळल्यास भरारी पथकांच्या माध्यमातून अचानक धाडी घालून कृषी सेवा केंद्रांच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.जिल्ह्यात मुबलक प्रमाणात बियाणे आणि खते उपलब्ध होणार असून सध्या २९२० मेट्रीक टन खत व ११००० क्विंटल बियाणे उपलब्ध असून शेतकर्‍यांनी काळजी करण्याची आवश्यकता नसल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी नीलेश भागेश्वर यांनी दिली.

बियाणे,खते व कीटकनाशकांचा गुणवत्तायुक्त पुरवठा होण्याच्या दृष्टीने जिल्हा स्तरावर कृषी विकास अधिकारी,जि.प.पालघर यांच्याकडे १ व प्रत्येक तालुकास्तरावर कृषी अधिकारी पंचायत समिती १ असे एकूण ९ तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.या नियंत्रण कक्षामध्ये प्रकाश राठोड यांची मोहीम अधिकारी (९४२३९८४४४३) तसेच अन्य अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.खरीप हंगामात बोगस खते आणि बियाणांची विक्री होऊ नये यासाठी भरारी पथकामार्फत बोगस खते व बियाणे विक्रीला आळा घालण्यात येणार आहे.यामुळे शेतकर्‍यांची फसवणूक टळेल अनधिकृतरीत्या होणार्या बोगस खते व बियाणांच्या विक्रीला आळा बसेल अशी माहीती कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -