भाईंदर : भाईंदर पूर्वेच्या सेवन इलेव्हन शाळेजवळील रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला क्रेनने चिरडले आहे. क्रेनच्या पुढील चाकाच्या खाली येऊन या वृद्ध महिलेचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. प्रत्यक्षदर्शी मिळालेल्या माहितीनुसार अपघातात मृत झालेल्या महिला मुंबई महापालिकेतून मुख्य लिपिक म्हणून सेवानिवृत्त झाल्या होत्या. त्या दररोज सेवन इलेव्हन शाळेजवळ फिरण्यासाठी व एका पानाच्या दुकानात पान खाण्यासाठी जात होत्या. आज देखील त्या पान खाण्यासाठी जात असताना, अचानक क्रेनने त्यांना रस्त्याच्या मध्यभागी धडक दिली, या धडकेत त्या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. मयत महिला यांना एक मुलगा व एक मुलगी असून ते नोकरी करत असतात. या घटनेमुळे स्थानिक नागरिकामध्ये शोककळा पसरली आहे, या घटनेची माहिती मिळताच नवघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी हे करत आहेत.
Bhayander Accident: वृद्ध महिलेला क्रेनने चिरडले
written By My Mahanagar Team
Bhayandar
पोलिसांनी क्रेन चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास नवघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धिरज कोळी हे करत आहेत.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -