भाईंदर : मीरा- भाईंदर, वसई – विरार पोलीस आयुक्तालय , मुंबई व इतर हद्दीत चोरी करणार्या सराईत आरोपीला मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. त्यानंतर आरोपीने केलेले ५ चोरीचे गुन्हे उघड करुन ३ मोटार सायकल आणि इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपी योगेश जयस्वाल हा सराईत गुन्हेगार ओस्तवाल ऑर्चीड बिल्डींग जवळ, तिवारी कॉलेज, मिरारोड पूर्व येथे येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, पोलीस हवालदार महेश वेल्हे, हनुमंत सुर्ववंशी, संग्रामसिंग गायकवाड, पोलीस शिपाई साकेत माघाडे या पोलीस पथकाने त्या ठिकाणी सापळा लावून योगेश बाबूलाल जयस्वाल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे चौकशी केली असता तपासात चोरीस गेलेल्या तीन मोटार सायकल आणि इतर २ चोरीच्या गुन्हयातील मुद्देमाल हस्तगत करुन मोटार सायकल चोरीचे ३ व इतर चोरीचे २ गुन्हे असे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेने उघडकीस आणले आहेत. त्यात आचोळे, डहाणू, कफ परेड व चर्चगेट आणि उमरगाव गुजरात येथील गुन्हे आहेत. तसेच आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी विरोधात भाईंदर, नवघर, दादर येथे २ गुन्हे, आझाद मैदान १० गुन्हे, ओशिवारा, खैरवाडी, ना.म.जोशी मार्ग, अंधेरी, प्रतापनगर पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे चोरीचे १९ गुन्हे दाखल असून या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आलेली आहे.
Bhayander Crime : सराईत आरोपीला अटक करुन ५ चोरीचे गुन्हे उघड
written By My Mahanagar Team
Bhayandar
आरोपी योगेश जयस्वाल हा सराईत गुन्हेगार ओस्तवाल ऑर्चीड बिल्डींग जवळ, तिवारी कॉलेज, मिरारोड पूर्व येथे येणार असल्याची माहिती मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांना मिळाली होती.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -