भाईंदर : काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार विक्री करणार्या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी फ्लॅट विक्रीची रील बनवून ती जाहिरात इन्स्टाग्रामवर टाकली होती.या फ्लॅट अनेकांना विक्री करणार्या सराईत ठगांना अटक करुन त्यांच्या कडून १६ लाख ५० हजार रुपये हस्तगत करण्यात काशीगाव पोलिसांना यश मिळाले आहे.यात एकूण तीन आरोपी असून अभिनव उर्फ निशांत राकेश मिश्रा , अविनाश ढोले, आणि विजय नारायण घंट यांना अटक करण्यात आली आहे. आठ गुन्हे उघडकीस आणले आहेत, सदरची कारवाई मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड आणि सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. विजय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तोगरवाड, पोलीस उपनिरीक्षक अभिजित लांडे, पोलीस हवालदार पाचऊंदे, पोलीस शिपाई देवक्तते, खंडारे, मढवी, सोनावणे यांनी केली आहे.
आरोपींवर या आधी देखील ८ गुन्हे दाखल आहेत. तर नवीन काशीगाव पोलीस ठाणे येथे तीन गुन्हे उघड झाले आहेत. काशिगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी फ्लॅटची बनावट कागदपत्रे तयार करुण फ्लॅट विक्रीच्या नावाखाली १६ लाख ५० हजार रुपये घेतल्याने फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील तक्रारदारांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर फ्लॅट विक्रीची रील बघून त्यातील फोन नंबरवर संपर्क साधला व इन्स्टाग्रामवर रील टाकणार्या इस्टेट एजंटच्या मीरारोड पूर्व परिसरातील ऑफिसमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी तयार केलेले बनावट कागदपत्र दाखवण्यात आले आणि नंतर त्यांच्याकडून सोळा लाख पन्नास हजार रुपये घेण्यात आले होते. त्यानंतर फ्लॅट घेण्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यास सांगण्यात आल्यावर टाळा टाळ करण्यात आली. यामुळे फ्लॅट विक्रीच्या नावाखाली फसवणूक केली जात असल्याचे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानंतर तक्रारदार सदर घटनेची माहिती काशीगाव पोलिसांना देत गुन्हा दाखल केला होता, पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरु केला.