घरपालघरBhayander News: उत्तनमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Bhayander News: उत्तनमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Subscribe

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती मिळाली की, उत्तन परिसरात गावठी हातभट्टी दारूची तस्करी करून ती बेकायदेशीर रित्या विकली जाते.

भाईंदर :- भाईंदर पश्चिमेच्या उत्तन सागरी पोलीस ठाणे हद्दीत १० मे रोजी रात्री साडेदहा वाजता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अवैध गावठी हातभट्टी दारूवर कारवाई करून ५२० लिटर गावठी हातभट्टी दारू व सुझुकी मारुती कार असा ५ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी माहिती मिळाली की, उत्तन परिसरात गावठी हातभट्टी दारूची तस्करी करून ती बेकायदेशीर रित्या विकली जाते. त्यावर उत्पादन शुल्क पोलिसांनी सापळा रचून उत्तन येथील आर.टी. मोटर्सच्या पाठीमागे, गावदेवी मंदिराच्या समोरील गल्लीमध्ये छापा मारला असता आरोपी राम पंडीत आडे, फैसल सलीम शेख, यांना अटक करण्यात आली. सदर गुन्हयात ५२० लिटर गावठी हातभट्टी दारू आणि चारचाकी सुझुकी स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केली आहे. आरोपी विरोधात उत्तन सागरी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (ई) अ, ८१, ८३ अन्वये अटक करून ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली आहे. सदरची कारवाई ही राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक अशोक देसले, दुय्यम निरीक्षक रत्नाकर शिंदे, जवान प्रवीण नागरे, जवान तारू यांनी केली आहे. तर सदरील गुन्हयाचा तपास दुय्यम निरीक्षक रत्नाकर शिंदे हे करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -