HomeपालघरBhayander Police: खुनाचे शंभर टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात यश

Bhayander Police: खुनाचे शंभर टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात यश

Subscribe

तर सदरील काम करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास यामुळे सदरील गुन्हे उघडकीस आणण्यास शक्य झाले आहे.

भाईंदर : मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाची सुरुवात होऊन तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुक्तालयाच्या हद्दीत २०२४ या चालू वर्षात गेल्या अकरा महिन्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. त्या गुन्ह्यांपैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा या सारखे गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना १०० टक्के यश मिळाले आहे. तर सदरील काम करताना सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास यामुळे सदरील गुन्हे उघडकीस आणण्यास शक्य झाले आहे. मीरा -भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालाच्या हद्दीमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, चैन स्नॅचिंग, गर्दी मारामारी, दुखापत, बलात्कार, विनायभंग, महिलांना पळवून नेणे, महिलांची व तरुणींना छेड करणे, अत्याचार, मारहाण, अभद्र भाषा वापरणे, अश्लिल वक्तव्य, अत्याचार असे अनेक प्रकारचे गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. पोलीस आयुक्त मधुकर पांडे व अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी दाखल असलेले जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणत आरोपींना अटक केली असून त्यात काही जणांना शिक्षा देखील झाली आहे. मीरा- भाईंदर परिमंडळ -१ च्या अंतर्गत शहरातील सर्व पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांपैकी खून (३ पैकी ३) गुन्हे, खुनाचा प्रयत्न (१५ पैकी १५), दरोडा (२ पैकी २), जबरी चोरी (२० पैकी १७), चैन स्नॅचिंग (५ पैकी ५), मारामारी (७३ पैकी ७३), दुखापत (२६२ पैकी २६०), बलात्कार (१३२ पैकी १३१), विनयभंग (१६३ पैकी १५८), पळवून नेणे (१४४ पैकी १३७ ), प्राणघातक अपघात (५१ पैकी ४६ ) असे दाखल असून त्यापैकी खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी यांचे १०० टक्के गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -