Maharashtra Assembly Election 2024
घरपालघरBhayander Sucide: २० महिन्यांत ६५१ जणांची आत्महत्या !

Bhayander Sucide: २० महिन्यांत ६५१ जणांची आत्महत्या !

Subscribe

म्हणजेच २० महिन्यांत ६५१ आत्महत्या झाल्याने अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी केलेली आहे. यात मुले आणि मुली, वयोवृद्ध तसेच तरुण, पुरुष यांनी कर्ज आणि नैराश्यातून तसेच प्रेमात धोका मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

भाईंदर : मीरा -भाईंदर शहराची लोकसंख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढलेली असून त्यातच त्यातच नागरी वस्तीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गाव खेड्यातून तसेच परराज्यातून नागरिकांचे लोंढे शहराकडे येत आहेत. त्यानुसार वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता मीरा-भाईंदर, वसई- विरार पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली होती. वाढत्या गुन्हेगारी सोबत शहरात आत्महत्येचे वाढलेले प्रमाण सुध्दा चिंतेचा विषय बनला आहे. तसेच गेल्या २० महिन्यांत ६५१ आत्महत्या झाल्याने अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. शहराची लोकसंख्या १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढती लोकसंख्या तसेच गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाची निर्मिती करण्यात आली. त्यामुळे गुन्हेगारीवर वचक बसविण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. परंतु शहरातील वाढत्या आत्महत्या पोलिसांसाठी आणि शासनासाठी चिंतेचा विषय बनला आहे. काशीमीरामधील सामाजिक कार्यकर्ते सचिन जांभळे यांनी माहितीचा अधिकार कायद्या अंतर्गत मिळविलेल्या माहितीनुसार सन २०२३ मध्ये ४३३ आत्महत्या झाल्याची नोंद आहे. तर जानेवारी २०२४ ते सप्टेंबर २०२४ या कालावधीत २१८ आत्महत्या झाल्याची नोंद पोलिसांत आहे. म्हणजेच २० महिन्यांत ६५१ आत्महत्या झाल्याने अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी केलेली आहे. यात मुले आणि मुली, वयोवृद्ध तसेच तरुण, पुरुष यांनी कर्ज आणि नैराश्यातून तसेच प्रेमात धोका मिळाल्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -