HomeपालघरBhayander Sucide: तिसर्‍या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या

Bhayander Sucide: तिसर्‍या मजल्यावरून उडी मारत महिलेची आत्महत्या

Subscribe

त्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश लोहार हे करत आहेत.

भाईंदर : भाईंदर पश्चिमेला मधुमेह आणि डायलिसीसच्या उपचाराला कंटाळून नैराश्यातून तिसर्‍या मजल्यावरून खाली उडी मारत ७४ वर्षीय महिलेने आत्महत्या केली आहे.याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. भाईंदर पश्चिमेच्या रंजन हाऊस राम मंदिर रोड येथे राहणार्‍या पुष्पा गजानन पाटील या महिंद्रा कंपनीतून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी होत्या. त्या मागील आठ वर्षांपासून मधुमेह या आजारापासून ग्रस्त होत्या.तसेच त्यांना महिन्यातून एक वेळा डायलिसिस उपचार चालू होते. तसेच त्यांची मानसिक स्थिती ठीक नसल्याने आजारपणाला खचून जात त्यांनी नैराश्यातून ३० डिसेंबर रोजी इमारतीच्या तिसर्‍या माळ्यावरून खाली उडी मारत आत्महत्या केली आहे. त्यानंतर तात्काळ त्यांना भाईंदर पश्चिमेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात नेले असता तेथील कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार योगेश लोहार हे करत आहेत.


Edited By Roshan Chinchwalkar