घर पालघर भिवंडी-वाडा रात्रीची शेवटची बस पुन्हा सुरू होणार

भिवंडी-वाडा रात्रीची शेवटची बस पुन्हा सुरू होणार

Subscribe

त्याच बरोबर पालघर येथून वाड्याच्या दिशेने संध्याकाळी ६:१५ वाजता बस सुरु करण्याची मागणी केली असता या दोन्ही बस १ मे पासून नियमित सुरु करत असल्याचे केंबुलकर यांनी सांगितले.

वाडा: भिवंडी येथून वाड्याकडे येण्यासाठी रात्री ९ वाजल्यानंतर एसटीची एकही बस नसल्याने प्रवाशांना खासगी वाहनाने प्रवास करावा लागत आहे. यापूर्वी या मार्गावर रात्री १०.३० वाजता असलेली भिवंडी-वाडा ही बस पुन्हा सुरू करावी, अशी मागणी वाडा तालुका प्रवासी संघटनेच्या वतीने वाडा आगाराचे आगार व्यवस्थापक यांचे कडे निवेदनाद्वारे केली आहे. १९९६ मध्ये वाडा एसटी बस आगार सुरू झाले. तेव्हा वाडा आगाराने भिवंडी-वाडा ही रात्री १०.३० वाजता शेवटची बस सुरू केली होती. ही बस नियमित सुरू होती. करोनाच्या पार्श्वभूमीवर वाडा आगाराने काही बसफेर्‍या बंद केल्या त्यात वाडा भिवंडी वाडा ही बस सुद्धा बंद केली होती. वाडा तालुका प्रवासी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी वाडा आगाराचे आगार व्यवस्थापक समीर केंबुलकर यांच्याशी वाडा भिवंडी वाडा ही बस पूर्ववत सुरु करण्याच्या मागणीसाठी चर्चा केली.

त्याच बरोबर पालघर येथून वाड्याच्या दिशेने संध्याकाळी ६:१५ वाजता बस सुरु करण्याची मागणी केली असता या दोन्ही बस १ मे पासून नियमित सुरु करत असल्याचे केंबुलकर यांनी सांगितले. तर इतरीही काही फेर्‍या वाढविण्याची व नवीन मार्गवरील फेर्‍या सुरु करण्याबाबती चर्चा झाली. याप्रसंगी प्रल्हाद शिंदे, प्रा.किरण थोरात, विशाल मुकने अनंता सुर्वे, संजय पवार, अलकनंदा भानुशाली, विपुल आंबेकर व संजय लांडगे उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -