Eco friendly bappa Competition
घर पालघर महाराष्ट्रातील पहिल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन संपन्न

महाराष्ट्रातील पहिल्या वारकरी भवनाचे भूमिपूजन संपन्न

Subscribe

या भव्य वारकरी भवनामुळे येणार्‍या पिढीला अध्यात्म शिकवले जाईल. यावेळी वारकरी भवन बांधत असल्यामुळे आमदार सरनाईक व आमदार जैन तसेच आयुक्त यांचे त्यांनी आभार मानले.

भाईंदर :- मीर- भाईंदरमधील काशिमिरा येथे महाराष्ट्र राज्यातील पहिल्या भव्य असे वारकरी भवनाचे भूमिपूजन ह.भ. प. निवृत्ती महाराज देशमुख ( इंदुरीकर ) यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार गीता जैन, आयुक्त दिलीप ढोले, ह.भ. प. संभाजी महाराज, श्री क्षेत्र तुकाराम महाराज संस्थान मादळमोही व इतर मान्यवर उपस्थित होते. मीरा -भाईंदरमध्ये वारकरी संप्रदायाला मानणारे लोक मोठ्या प्रमाणात असून गेले अनेक वर्षे ’वारकरी भवन’ शहरात व्हावे, अशी श्री नारायणगड सेवा भावी संस्थेच्या वतीने काशिद बंधू यांची मागणी होती. या मागणीनुसार आमदार प्रताप सरनाईक यांनी हे वारकरी भवन मंजूर करून त्याचे भूमीपुजन करण्यात आले आहे. भूमीपूजनानंतर इंदुरीकर महराज यांचे समाजप्रबोधन कीर्तन ठेवण्यात आले होते. यावेळी इंदुरीकर महाराज यांनी जगाचा पाया हा ज्ञानदेव आहे, तर कळस तुकाराम महाराज, विस्तार नामदेव महाराज व खांब एकनाथ महाराज आहेत असे सांगितले.
जीवनात चांगले माणूस बनायचे असेल तर वारकरी संप्रदाय आवश्यक आहे. आज वृद्धाश्रमाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. वारकरी संप्रदाय घराघरात पोहेचेल तेव्हाच वृद्धाश्रम हे बंद होतील व ती काळाची गरज आहे असे ह. भ. प. इंदुरीकर महाराज यांनी सांगितले. या भव्य वारकरी भवनामुळे येणार्‍या पिढीला अध्यात्म शिकवले जाईल. यावेळी वारकरी भवन बांधत असल्यामुळे आमदार सरनाईक व आमदार जैन तसेच आयुक्त यांचे त्यांनी आभार मानले.

यावेळी आमदार सरनाईक म्हणाले की, जनतेच्या मागणीनुसार आमदार प्रताप सरनाईक यांनी हे वारकरी भवन मंजूर केले व त्यासाठी शासनाकडून दोन कोटी रुपये निधी मंजूर करून त्याचे आज भूमिपूजन केले आहे. हे वारकरी भवन डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल. अनेक नवीन कीर्तनकार, प्रवचनकार तयार होण्यासाठी या वारकरी भवनातून त्यांना आवश्यक ते सहकार्य दिशा मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कीर्तनकार, प्रवचनकार शहरात कीर्तन – प्रवचनासाठी आल्यास त्यांच्या राहण्यासाठी विश्रामव्यवस्था भवनात केली जाणार असल्याचे आमदार सरनाईक यांनी सांगितले आहे. मीरा -भाईंदर शहरातील वारकरी संप्रदायातील सर्व वारकरी, भजनी मंडळी, कीर्तनकार, भक्ती मार्गातील नागरिक मोठ्या संख्येने या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित होते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -