डहाणू: डहाणू तालुक्यातील दुर्गम भाग सायवन निंबापूर येथे गेल्या २० वर्षांपासून रखडलेला गावातील रस्तामंजूर झाल्याने गावातील लोकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. या रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले.सायवन भागातील जवळ जवळ सुमारे २ कोटी रुपये एवढ्या निधीच्या कामांचे आज भूमिपूजन करण्यात आले. या वेळी पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम, उपाध्यक्ष पंकज कोरे , जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी , मंगेश भोईर , डहाणू पंचायत समिती माजी सभापती स्नेहलता सातवी, सभापती प्रवीण गवळी , पंचायत समिती बांधकाम विभाग अधिकारी, पाणीपुरवठा अधिकारी , इत्यादी प्रशासकीय यंत्रणा व पंचायत समिती सदस्य पिंटी बोरसा , सुभाष चौरे , शैलेश हाडळ, तसेच जवळ जवळ १० ते १२ गावाचे सरपंच उपस्थित होते. तसेच निंबापुर गावचे ग्रामसेवक दीपक चव्हाण , चळणी ग्रामपंचायत ग्रामसेवक अरविंद पाटील , सायवन ग्रामपंचायत ग्रामसेवक पिंपळे व या गटातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये विविध कामांचा निधी उपलब्ध करून देण्यात जिल्हा परिषद पालघर बांधकाम माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी, सरपंच रमेश बोरसा यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
सायवन चळणी येथील अपुर्या पुलाचे काम रखडले होते. पावसाळ्यात चळणी ग्रामस्थांचे या पुला अभावी मोठे हाल होत होते. तसेच या ठिकाणी न्यू इंग्लिश स्कूल आणि माध्यमिक आश्रम शाळा असल्याने पावसाळ्यात अरुंद आणि साकड पुल पुरामुळे बुडून जायचे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना बाहेरून येणार्या जेवणाच्या डब्याचा पुरवठा खंडित होऊन मुलांना उपाशी रहावा लागत होते. ही गंभीर समस्या लक्ष्यात घेत अपूर्ण पुलाचे काम तात्काळ होणे गरजेच आहे. यासाठी निधीची तरतूद करत मंजुरी देत या रुंद पुलाचे आज भूमिपूजन करण्यात आले. तसेच यावेळी सायवन महालपाडा येथे नवीन मंजूर करण्यात आलेल्या अंगणवाडीचे भूमिपूजन करण्यात आले. त्याचबरोबर धरमपूर येथे आरोग्यदृष्ट्या नवीन आरोग्य केंद्र मंजूर असलेल्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले . तसेच चळणी या ग्रामपंचायतीमध्ये जलजीवन विभागाच्या मोहिमेची काम अपूर्ण आणि बंद असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. तसेच सर्व रस्ते खोदलेले असून गावातील ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यावर तात्काळ कारवाई करावी यासाठी सरपंचांकडून निवेदन देण्यात आले. येथील ठेकेदार कंपनीवर कारवाई करत काही कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले असून तात्काळ नवीन मंजुरी आदेश काढत नव्याने निविदा काढण्यात येईल .तसेच लवकरच अपूर्ण काम पूर्ण करण्यात येईल असे अध्यक्ष प्रकाश निकम व उपाध्यक्ष कोरे यांनी सांगितले.
पक्ष न बघता सर्व सरपंच , सदस्य , जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी एकत्र राहून आपल्या ग्रामीण भागातील विकास करून घ्यावा. आपल्या जिल्ह्याचा विकास आपल्या हातात आहे. त्यामुळे आपला विकास हा आपल्या हातात आहे असे सर्व सरपंच यांना मार्गदर्शन केले. पक्षाची निष्ठा सोडून द्यावी व आपल्या समाजातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन काम करावे. सर्व सरपंचांनी आपले अधिकार वापरावेत.
– प्रकाश निकम , जिल्हा परिषद अध्यक्ष, पालघर