घरपालघरबोईसरमधील गुंडाराज विरोधात भूमिपुत्र आक्रमक

बोईसरमधील गुंडाराज विरोधात भूमिपुत्र आक्रमक

Subscribe

शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी टीमा सभागृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत परिसरातील १०० पेक्षा अधिक प्रतिष्ठित स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते.

बोईसर : बोईसर आणि तारापूर औद्योगिक परिसरात वाढत चाललेली गुंडगिरी, दहशत आणि अवैध धंदे या विरोधात आत्ता स्थानिक भूमिपुत्र चांगलेच आक्रमक झाले असून यामध्ये काही संघटना व परप्रांतीयांची सुरू असलेली गुंडगिरी व दादागिरी मोडीत काढून शहरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी टीमा सभागृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत परिसरातील १०० पेक्षा अधिक प्रतिष्ठित स्थानिक भूमिपुत्र सहभागी झाले होते.

बोईसर शहरात ७ आणि ८ मे च्या रात्री गुंड प्रवृत्तीच्या टोळक्याने हातात चाकू आणि कोयत्या सारखी धारधार शस्त्रास्त्रे नाचवत रक्तरंजित राडा घातला होता. यामध्ये तीन युवक गंभीर जखमी झाले होते.लागोपाठ दोन रात्री टोळक्यांचा सुरू असलेला हैदोस बघून शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. बोईसर पोलिसांनी ७ मेच्या रात्री भैय्या पाडा आणि यशवंतसृष्टी येथे टोळक्याने केलेला राडा गांभीर्याने घेतला नसल्याची टीका समाज माध्यमावर सुरू झाल्यावर खडबडून जागे झालेल्या पोलिसांनी नंतर याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली असून पाच आरोपी अजून ही फरार आहेत.
या हाणामारी प्रकरणातील दोन्ही बाजूचे फिर्यादी आणि आरोपी हे परप्रांतीय असून बोईसर शहर आणि तारापूर औद्योगिक परिसरातील वाढती गुंडगिरी, अवैध धंदे व सामाजिक आणि धार्मिक सलोखा बिघडण्यामागे काही संघटना व परप्रांतीय नागरिक अधिक जबाबदार असल्याचा तसेच तारापूर औद्योगिक क्षेत्र आणि बोईसर परिसरातील सुरू असलेल्या बेकायदा धंद्यांना चाप लावून यात सहभागी माफियांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास पोलीस सपशेल अपयशी ठरत असल्याचा गंभीर आरोप यावेळी अनेकांनी केला.

- Advertisement -

स्थानिक भूमिपुत्रांच्या या बैठकीत शिवशक्ती संघटनेचे संजय पाटील, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख उत्तम पिंपळे,शिवसेना जिल्हाप्रमुख कुंदन संखे,मनसे ग्रामीण जिल्हा प्रमुख समीर मोरे,मनसे शहर जिल्हा प्रमुख भावेश चुरी,भाजपचे उप जिल्हाध्यक्ष अशोक वडे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष सचिन पाटील, जि.प.सदस्या भावना विचारे,उपसरपंच निलम संखे,आर पीआयचे सचिन लोखंडे,भाजप मंडळ अध्यक्ष जितेंद्र संखे, पर्यावरण रक्षण कार्यकर्ते मनीष संखे, सामाजिक कार्यकर्ते भावेश पावडे,भावेश मोरे,मुकेश पाटील, उपसरपंच संदीप घरत,गजानन देशमुख यांच्यासह अनेक तरुण कार्यकर्ते सहभागी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -