HomeपालघरBhyander Corporater :पतंगाचा स्टॉल लावण्यावरून राडा

Bhyander Corporater :पतंगाचा स्टॉल लावण्यावरून राडा

Subscribe

भाईंदर :मकर संक्रात निमित्त पतंगाचा स्टॉल लावण्यासाठी झालेल्या वादात भाजपच्या दोन माजी नगरसेविका आपापसात भिडल्या आहेत. या प्रकरणी एका नगरसेविकेच्या तक्रारीवरून दुसरी नगरसेविका आणि तिच्या पतीविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मीरा रोड येथील शांती नगर सेक्टर ७ परिसरात विपिन वोरा या विक्रेत्याला पालिकेने येथील स्वामी नारायण मंदिराबाहेर पतंगाचा स्टॉल लावण्याची परवानगी दिली आहे. मात्र सध्यस्थितीत या ठिकाणी एका बाजूला फेरीवाले आणि दुसर्‍या बाजूला ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे स्टॉलची मूळ जागा अडवण्यात आल्यामुळे विपेन वोरा हे मदतीसाठी स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका हेतल परमार यांच्याजवळ गेले होते.सोमवारी संध्याकाळी हेतल परमार या याठिकाणी गेल्या.

त्यावेळी माजी नगरसेविका दिप्ती भट देखील आल्या. दोन्ही माजी नगरसेविका समोरासमोर आल्या आणि भांडणाला सुरूवात झाली. या प्रकरणात हेतल परमार यांच्या तक्रारीवरून दीप्ती भट आणि त्यांचे पती शेखर भट यांच्याविरोधात नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांती नगर सेक्टर ७ जवळील स्वामी नारायण मंदिराबाहेर स्टॉल साठी ज्येष्ठ नागरिकांना धमकावून बाकडे हटवण्यात येत असल्याची तक्रार काही ज्येष्ठ नागरिकांनी केली होती. त्यामुळे यावर तोडगा काढण्यासाठी मी आणि माझे पती महापालिकेच्या फेरीवाला पथकासोबत त्या ठिकाणी हजर होतो. दरम्यान याबाबतची चर्चा सुरु असतानाच हेतल परमार त्या ठिकाणी येऊन आमच्यावर खोटे आरोप करू लागल्या. आम्हाला देखील शिविगाळ करून धमकावण्यात आले आहे. मी देखील या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे, असे माजी नगरसेविका दीप्ती भट यांनी सांगितले.


Edited By Roshan Chinchwalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -