Eco friendly bappa Competition
घर पालघर पंचायत समित्यांमध्येही आजपासून बायोमेट्रिक हजेरी

पंचायत समित्यांमध्येही आजपासून बायोमेट्रिक हजेरी

Subscribe

यापुढे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये देखील बायोमेट्रिक बसवण्याचा मानस आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी व्यक्त केले.

पालघरः पालघर जिल्हा परिषद पाठोपाठ आता जिल्ह्यातील आठही पंचायत समित्यांमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आल्या असून यापुढे पंचायत समितीमध्ये प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांची हजेरी बायोमेट्रिक मशीनद्वारे लागणार आहे. गटविकास अधिकार्‍यांपासून ते सर्व पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांना आता बायोमेट्रिकद्वारे हजेरी बंधनकारक आहे. शुक्रवारी सर्व गटविकास अधिकार्‍यांनी थंब करून मशिन्सचा शुभारंभ केला. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांच्या पुढाकारामुळे पंचायत समितीमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात आल्या आहेत. पंचायत समित्यांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर वेळेचे बंधन राहील तसेच उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांना बायोमेट्रिकमुळे वेळेत येणे अनिवार्य राहील या हेतूने पंचायत समितीमध्ये या मशीन बसवण्यात आल्या आहेत. दांडी बहाद्दर कर्मचार्‍यांना आता चाफ बसणार असून पंचायत समित्यांमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यावर अंकुश राहील. यापुढे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये देखील बायोमेट्रिक बसवण्याचा मानस आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी व्यक्त केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -