घरपालघरमोखाडा बांधकाम विभागाची डोळेझाक

मोखाडा बांधकाम विभागाची डोळेझाक

Subscribe

मात्र वरपासून खालपर्यंत टक्केवारीची चर्चा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यात आले आहे,अशी चर्चा आहे.

मोखाडा : मोखाडा- खोडाळा रस्त्यावरील सडकवाडीच्या जवळ साईडपट्टीचे काम करण्यात आले. मात्र हे करताना आवश्यक खोदकाम मजबुतीकरण न करता जेसीबीच्या सहाय्याने वरवर उकरून साधी मातीही बाजुला करण्याचा त्रास न घेता ठेकेदारांनी त्यातच खडी पसरवली आणि डांबर मारून थातूर- मातूर काम केले. मात्र वरपासून खालपर्यंत टक्केवारीची चर्चा असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या भ्रष्टाचाराला पाठीशी घालण्यात आले आहे,अशी चर्चा आहे.

काही दिवसांपूर्वीच मनसेने हे काम बंद पाडले होते. मात्र तरीही या कामांची बिले निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.मुळात साईडपट्टीचे काम करताना किमान एक फुटापेक्षा अधिक खोदून पाणी मारून खडी अंथरणे, त्याला रोलरने दाबणे, यानंतर पुन्हा खडीकरण डांबरीकरण या पद्धतीने तीन ते चार प्रक्रियेत बनवावी लागते. इथे मात्र एक जेसीबी आणि डब्यात डांबर भरून दोन ते तीन दिवसांतच हे काम उरकले आहे.याशिवाय हे काम करताना संपूर्ण मजुरांच्या भरोवशावर सोडून ठेकेदार आणि अभियंतेही गायब असतात. कसलीही पाहणी होत नाही. काम पूर्ण नसतानाही बिले काढली जातात. यामुळे आता सडकवाडी गावाजवळील या साईडपट्टीच्या कामांच्या चौकशीची मागणी होत आहे.

- Advertisement -

सदरची साईडपट्टीच्या दर्जा तपासायचा झाल्यास येथे पाहणी केल्यास भ्रष्टाचार दिसून येईल. कारण अंथरलेली खडी आताच निघाली असून साध्या पायानेही ही खडी निघून जात आहे. त्यातच काम करणार्‍या यंत्रणेचे नाव एकाचे आणि काम करणारे ठेकेदार वेगळेच असा प्रकार असल्याने याची चौकशी होवून संबधितावर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे.या विषयी उपअभियंता विशाल अहिरराव यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.नंतर शाखा अभियंता बोडके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मला प्रतिक्रिया देण्याची परवानगी नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -