घरपालघरवैतरणा खाडीत 40 कामगार असलेली बोट बुडाली; 34 सापडले, 6 जणांचा शोध सुरु

वैतरणा खाडीत 40 कामगार असलेली बोट बुडाली; 34 सापडले, 6 जणांचा शोध सुरु

Subscribe

40 पैकी 34 कामगारांना वाचवले, उर्वरीत सहा कामगारांचा शोध सुरूच आहे.

सफाळे (पालघर) : मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या कामासाठी रात्रपाळी करून सकाळी नवघर बंदराजवळ बोटीने येणार्‍या 40 कामगारांसह एक बोट वैतरणा खाडीपात्रात बुडाल्याची घटना सोमवारी (20 नोव्हेंबर) सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक मच्छीमार बांधव आणि पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू करून अनेक कामगारांचे प्राण वाचवले. बचाव मोहिमेत 40 पैकी 34 कामगारांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले असून, यातील 4 कामगारांना सफाळे येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर बुडालेल्या 6 कामगारांचा अद्यापही शोध सुरूच आहे. हे सर्व कामगार बंगाल, मध्य प्रदेश, बिहार येथे राहणारे आहेत. (Boat with 40 workers sinks in Vaitarna Bay 34 found search for 6 started)

पालघर जिल्ह्यात मुंबई-वडोदरा एक्स्प्रेस वेच्या उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. जीआर इन्फ्रा कंपनीकडे या कामाचा ठेका आहे. वैतरणा नदीपात्रात पूल उभारण्याचे काम करणार्‍या कामगारांची नदीपात्रातून ने-आण करण्यासाठी स्टील प्रवासी बोट वापरण्यात येते. सोमवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास रात्रपाळी करून निघालेल्या कामगारांना घेऊन ही बोट नदीकिनारी येत होती. वैतरणा नदीपात्रात वाढीव-वैतीपाडानजीक ही बोट बिघडल्याने टग बोट वापरून या बोटीला नदीकिनारी आणले जात होते. टग बोटीत एका बाजूला कामगार बसल्याने ही बोट एका बाजूला कलंडून पाण्यात बुडाली. बोट नदीत बुडत असल्याचे लक्षात येताच बोटीतील काही कामगारांनी नदीपात्रात उड्या मारून पोहत किनारा गाठला. दुर्घटनेची माहिती मिळताच पालघरचे प्रांताधिकारी, तहसीलदार, उपविभागीय पोलीस अधिकारी, मंडळ अधिकारी, सफाळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी, कर्मचारी व बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. तातडीने बचावकार्य करून 34 कामगारांना पाण्याबाहेर काढण्यात यश आले, तर 6 जणांचा शोध सुरू आहे.

- Advertisement -

हेही वाचा : ‘माझ्याकडे आणखी 27 फोटो- 5 व्हिडीओ’; संजय राऊतांचा बावनकुळेंवर पुन्हा हल्लाबोल

बेपत्ता कामगारांच्या आकडेवारीत तफावत

प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीत 20 कामगार सापडले असून 2 कामगारांचा शोध सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. आदर्श शुक्ला आणि निर्मल मिश्रा अशी या 2 बेपत्ता कामगारांची नावे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. स्थानिकांची माहिती आणि प्रशासनाच्या आकडेवारीत मोठी तफावत असल्याचे यावरून दिसत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -