वसई विरार महानगरपालिकेच्या डी.एम.पेटीट रुग्णालयात धक्कादायक प्रकार, १२ तास मृतदेह जनरल वॉर्डमध्ये

पालघर – वसई विरार महानगरपालिकेच्या डि.एम.पेटीट या रुग्णालयात तब्बल १२ तास मृतदेह जनरल वॉर्डमध्ये पेशंटच्या शेजारी ठेवल्याचा धक्कादायक विडिओ समोर आला आहे. धिरज वर्तक यांनी हा धक्कादायक प्रकार समोर आणला आहे.

वसई विरार महानगरपालिकेच्या डि.एम. पेटीट या रुग्णालयत काल राञी १० वाजता एक बेवारस मृतदेह आला होता. रुग्णालयाच्या कर्मचा-यांनी मृतदेह जनरल वॉर्डमध्ये ठेवले. त्या रुममध्ये तीन ते चार पेशंट होते. सकाळी १० वाजता धिरज वर्तक या तरुणाने हा प्रकार उघड केला. त्यावेळी रुग्णालयातील कर्मचा-यांनी मृतदेह दुसरी कडे हलवले. मात्र, त्या मृतदेहावर माश्या मच्छर जमा झाल्या होत्या. त्या माश्या आणि इतर पेशंटला रात्रभर त्रास देत होत्या. रुग्णालयाच्या या हलगर्जीपणा बाबत पेशंटच्या नातलगांनी रोष व्यक्त केला आहे.