बोगस रेशनकार्ड घोटाळा; महा ई-सेवा केंद्राविरोधात गुन्हा

एका महिलेला बोगस रेशन कार्ड बनवून दिल्याप्रकरणी पालघरमधील महा ई-सेवाच्या मालकासह तीन जणांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

एका महिलेला बोगस रेशन कार्ड बनवून दिल्याप्रकरणी पालघरमधील महा ई-सेवाच्या मालकासह तीन जणांविरोधात पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पालघर तालुक्याच्या सफाळे भागातील एका महिलेने रेशनकार्ड तयार करण्याचे काम नितेश पारधी नामक एजंटला दिले होते. नीलेश पारधी याने पालघर शहरातील महा ई-सेवा केंद्राचा मालक जयेश पाटील यांच्या माध्यमातून पुरवठा विभागाच्या कार्यालयातील कंत्राटी कर्मचारी शुभम पाटील यांच्या मदतीने बोगस रेशन कार्ड तयार करून महिलेला दिले होते. रेशनकार्डवर धान्य मिळत नसल्याने प्राधान्य कुटुंबाचा शिक्का मारून घेण्यासाठी बोगस रेशनकार्ड घेऊन ही महिला पालघर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागाच्या कार्यालयात आली होती. पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेशनकार्ड पाहिल्यानंतर रेशनकार्ड बोगस असल्याचे आढळून आले. त्यानंतर पुरवठा निरीक्षक देवेंद्र पाटील यांनी महिलेचा जबाब नोंदवून पालघर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार पालघर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ४२०, ४६५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पालघर पोलिसांकडून रेशनकार्ड तयार करणारा एजंट निलेश पारधी, महा ई सेवा केंद्राचा मालक जयेश पाटील आणि पुरवठा विभागातील कंत्राटी कर्मचारी शुभम पाटील याला अटक करण्यात आली आहे. आरोपींना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुरवठा विभागाच्या कार्यालयात कोऱ्या रेशनकार्डांवर नावे लिहिण्याचे काम काही संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते करत असल्याचे चित्र नेहमीच असते. तहसिलदारांच्या आदेशाने पुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून शेकडो कोरी रेशनकार्डे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली जात असल्याची माहिती पुढे येत आहे. कोरी रेशनकार्डे बिनबोभाट संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपलब्ध दिली जात असल्याने पालघर पुरवठा कार्यालयातून हजारो बोगस रेशनकार्ड तयार केली गेल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा –

Property tax exemption : मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता करमाफी, राज्य