घरपालघरबोईसर रुग्णालयाचे काम रखडले, प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

बोईसर रुग्णालयाचे काम रखडले, प्रशासकीय मान्यतेची प्रतीक्षा

Subscribe

टीमा रुग्णालय २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. पण ही मुदत संपली आहे.त्यामुळे पुन्हा ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत शोधण्याची वेळ येणार आहे.

बोईसर : पाच ते सहा वर्षांपासून बोईसर ग्रामीण रुग्णालयाचे भिजते घोंगडे कायम आहे. त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. परिणामी गरजू रुग्णांना शासकीय आरोग्यसेवा दुरापास्त झाल्या असून रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. बोईसर संजयनगर (सरावली) येथे ’ग्रामीण रुग्णालय बोईसर ’ च्या इमारतीच्या बांधकामाकरिता जिल्हाधिकार्‍यांनी २०२१ मध्ये परवानगी दिली होती. वैद्यकीय अद्ययावत इमारतीच्या आकृतीनुसार नव्याने सुधारित अंदाजपत्रक सादर करून सदर अंदाज पत्रकामध्ये अद्ययावत सेवा करण्याचे नियोजन तळमजला आणि पहिला मजला असे शासनाचे धोरण आहे . नव्याने तयार केलेल्या आराखड्यानुसार सुधारित ३८ कोटी २० लाख रूपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले आहे असे सार्वजनिक बांधकाम विभाग सांगितले.परंतु, या रुग्णालयासाठी ६० गुंठे सरकारी जागा उपलब्ध असताना त्याचे अंदाजपत्रक प्रलंबित आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालयाच्या तुटपुंज्या आरोग्य सेवेमुळे हे रुग्णालय नेहमीच चर्चेत राहिले आहे. सहा वर्षांपूर्वी हे रुग्णालय एका जर्जर इमारतीत सुरू झाले होते. त्यावेळी रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता. अलीकडील काळात हे रुग्णालय टीमाच्या पडक्या आणि गळक्या इमारतीत स्थलांतर केले आहे. मात्र येथे आरोग्य सुविधेची वानवा आहे. टीमामध्ये फक्त बाह्यउपचार (ओपीडी) सुरू आहेत. रुग्णालयात प्रसूती होत नसल्याने गरोदर मातांची फरफट कायम आहे. रुग्णांना साध्या उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये पदरमोड करावी लागत आहे. बोईसर ग्रामीण रुग्णालय म्हणून टीमा येथे फक्त ३० खाटांचे रुग्णालय सुरू झाले. टीमा रुग्णालय २०२३ पर्यंत सुरू ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न होता. पण ही मुदत संपली आहे.त्यामुळे पुन्हा ग्रामीण रुग्णालयासाठी इमारत शोधण्याची वेळ येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मान्यतेसाठी अंदाजपत्रक आणि आराखडे प्राप्त करून घेण्याची कार्यवाही चालू आहे. मंजूर झाल्यानंतर २०२२ इंडियन पब्लिक हेल्थ स्टँडर्ड अनुषंगाने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार अंदाज पत्रक आणि आराखडे नव्याने पुन्हा तयार केले.

- Advertisement -

– भाऊ शिणलकर , प्रशासकीय अधिकारी गट ( ब ), आरोग्य विभाग

सदर अंदाज पत्रकामध्ये अद्ययावत सेवा करण्याचे नियोजन तसेच तळमजला अधिक पहिला मजला असे शासनाचे धोरण आहे.

- Advertisement -

-कल्पेश पाटील – कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

रुग्णालय सध्या टीमामध्ये चालू आहे. नवीन इमारत प्रस्ताव शासन स्तरावर असून प्रयत्न चालू आहेत.तसेच पाठपुरावा देखील चालू आहे.
– राजेश पाटील, आमदार, बोईसर विधानसभा

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -