मनोर: प्रचाराला बंदी असताना सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगरमध्ये बॅनर लावून प्रचार केल्या प्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हितेश परब यांनी दिलेल्या फिर्याद ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांच्या साक्षीवरून बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भारतीय न्याय संहितेचे कलम 126 (1) (2) (3) आणि लोक प्रतिनिधी अधिनियम सन 1951 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरावली ग्रामपंचायत हद्दीतील अवधनगरच्या अजमेरी गल्लीमध्ये विधानभा निवडणुकीच्या प्रचाराची मुदत संपल्यानंतर प्रचारासाठी लावण्यात आलेला बॅनर काढण्यात आला नाही.प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरु असण्याच्या काळात प्रचाराला बंदी असताना बोईसर विधानसभा मतदार संघातील शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षाचे उमेदवार डॉ. विश्वास वळवी यांनी प्रचाराचा बॅनर लावून पक्षाचा प्रचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी हितेश परब यांनी दिलेली फिर्याद आणि सरावली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांच्या साक्षी वरून डॉ. विश्वास वळवी आणि अज्ञात इसमाविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Boisar Vidhansabha : बॅनर लावल्याप्रकरणी उमेदवाराच्या विरोधात गुन्हा
written By My Mahanagar Team
manor
याप्रकरणी हितेश परब यांनी दिलेली फिर्याद आणि सरावली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सुभाष किणी यांच्या साक्षी वरून डॉ. विश्वास वळवी आणि अज्ञात इसमाविरोधात बोईसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संबंधित लेख
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -